शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

राष्ट्रीय अवयवदान दिन: ५ हजार लोकांना किडनीदानाची प्रतीक्षा; १,२८४ रुग्ण लिव्हर, तर १०८ जणांना हवंय हृदय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 14:58 IST

सध्याच्या घडीला राज्यातील अवयवनिहाय  रुग्णांची प्रतीक्षा यादी पाहिली, तर ‘किडनी’ या अवयवाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.   

मुंबई : गेल्या काही वर्षांत अवयवदान विषयावर जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असले, तरीही अवयवदानाची मोहीम अजून संथ गतीने सुरू आहे. या मोहिमेला बळ मिळण्यासाठी शासनासोबत सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.  सध्याच्या घडीला राज्यातील अवयवनिहाय  रुग्णांची प्रतीक्षा यादी पाहिली, तर ‘किडनी’ या अवयवाची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे.   

जुनाट किडनी आजाराने दोन्ही किडन्या निकामी होतात. सर्व उपचार करून झाल्यानंतरही ज्यावेळी किडनी उपचारांना प्रतिसाद देत नाही, त्यावेळी किडनी अवयवाचे प्रत्यारोपण हा एकाच पर्याय असतो, अन्यथा रुग्णांना कायमस्वरूपी डायलिसिस करावे लागते. त्यामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते, तर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेने मानवासाचे आयुर्मान वाढत असून, सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. त्यासोबत आता लिव्हर आणि हृदय अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांत मोठी वाढ झाली आहे, तसेच हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, पण आता राज्यात होऊ लागल्या आहेत.  देशात मानवी अवयव आणि उती प्रत्यारोपण कायदा, १९९४ नुसार मानवी शरीरात प्रत्यारोपण केले जाते. एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदानातून ८ जणांचे जीव वाचवू शकते.

अवयवनिहाय राज्यातील रुग्णांची प्रतीक्षा यादीकिडनी  - ५,८३२लिव्हर  - १,२८४हृदय - १०८फुप्फुस - ४८स्वादुपिंड - ३५छोटे आतडे - ३हात - ३

मुंबईतील वर्षनिहाय अवयवदानवर्ष     अवयवदान२०२०     ३०२०२१     ३३२०२२     ४७

वर्ष   अवयवदान२०२०    ७४२०२१    ९५२०२२    १०५

हार्ट ट्रान्सप्लांट केईएममध्ये सुरू होणार महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात येत्या सहा महिन्यांत हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे केईएम रुग्णलयाच्या - अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

अवयव प्रत्यारोपणाशी संबंधित सगळ्या गोष्टी एकाच छताखाली येण्यासाठी तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांनी ट्रान्सप्लांट युनिव्हर्सिटी सुरू केल्या आहेत, तशा युनिव्हर्सिटी आपल्याकडे सुरू करता येऊ शकतात का, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अवयवदान जनजागृतीपासून ते अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सगळ्या गोष्टी या युनिव्हर्सिटीतर्फे केल्या जातात. किडनी अवयवांसाठी प्रतीक्षा यादी मोठी आहे.  गेल्या काही वर्षांत अवयवदान चळवळीला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मात्र, ही चळवळ अधिक व्यापक  होण्याची गरज आहे. अजून मोठ्या संख्येने  सामाजिक संस्थांनी  पुढे येऊन, या अवयवदानाबाबत जनजागृती केली पाहिजे.   - डॉ. सुजाता पटवर्धन, संचालिका, राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था 

टॅग्स :Organ donationअवयव दानMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटल