शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोनसाखळी खेचणा-या इराणी टोळीस दिल्लीहून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:45 IST

नाशिक : पुढे, खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अंगावरील दागिने काढून ठेवा अशी बतावणी करून वृद्ध नागरिक तसेच महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या खेचणा-या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या इराणी टोळीतील पाच संशयितांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने दिल्लीतून अटक केली आहे़ या संशयितांनी शहरातील सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून ५ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आहे़ त्यामध्ये स्विफ्ट डिझायर कारसह १२७ ग्रॅम सोन्याचे दागिण्यांचा समावेश आहे़

ठळक मुद्देश्रीरामपूरच्या इराणी टोळी ; नाशिक शहरातील सहा गुन्ह्यांची कबुली१२७ ग्रॅम सोन्याचे दागिने, स्विफ्ट डिझायर कार ; पाच लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढे, खून झाला आहे, आम्ही पोलीस आहोत, अंगावरील दागिने काढून ठेवा अशी बतावणी करून वृद्ध नागरिक तसेच महिलांच्या अंगावरील सोनसाखळ्या खेचणा-या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या इराणी टोळीतील पाच संशयितांना नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने दिल्लीतून अटक केली आहे़ या संशयितांनी शहरातील सहा गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून ५ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आहे़ त्यामध्ये स्विफ्ट डिझायर कारसह १२७ ग्रॅम सोन्याचे दागिण्यांचा समावेश आहे़

शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने दिल्लीहून अटक केलेल्या इराणी टोळीतील संशयितांमध्ये सलीम नुरअली इराणी (४०), कंबर शाहजान जाफरी (३२), रियाज फैयाज इराणी (३८), राज पोलीद इराणी (३४, चौघे रा. श्रीरामपूर, जि. नगर) आणि महंमद अजिज जाफरी (३४, रा. काळभोर, जि. पुणे) यांचा समावेश आहे़ गुन्हे शाखने यापुर्वीच शहरात घरफोड्या करणा-या दिल्लीतील तिन सराईतांना अटक केलेली आहेग़त आठवड्यात गुन्हे शाखेने शहरात घरफोडी करणा-या दिल्लीतील आंतरराज्यीत टोळीस अटक केल्यानंतर त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस निरीक्षक आनंद वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार रविंद्र बागूल, पोलीस शिपाई विशाल देवरे, चालक दीपक जठार हे जयपूरमार्गे दिल्लीला जात होते़

या प्रवासादरम्यान चेनस्रॅचिंग व तोतया पोलिसांची माहिती घेण्याचे काम सूरू होते़ त्यांना श्रीरामपूरची इराणी टोळी चोरी करण्यासाठी दिल्लीला जात असलयाची माहिती मिळाली़ त्यानुसार वाघ यांनी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून इराणी टोळीतील पाच संशयितांना स्विफ्ट कारसह ताब्यात घेतले़ गुन्हे शाखेतील दुसरे पथक सहायक पोलीस निरीक्षक खैरनार,पोलीस हवालदार दिघोळे, पोलीस शिपाई स्वप्निल जुंदे्र, राहुल पालखेडे, रावजी मगर, मोहन देशमुख यांचे पथक रवाना झाले व त्यांनी या पाचही संशयितांना नाशिकला आणले़

पोलीस आयुक्त डॉ़रविंद्र सिंगल,उपआयुक्त विजयकुमार मगर, सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहायक पोलीस निरीक्षक दीपक गिरमे, मोहिते, सहायक फौजदार पोपट कारवाळ, जाकिर शेख, पळशीकर, पोलीस हवालदार मुळक, पांडव, दोंदे, पोलीस नाईक मोंढे, कोरडे, तांबोळी, पोलीस शिपाई सूर्यवंशी, महाले, काठे, गणेश वडजे, गणेश रुमाले, सचिन आजबे, विलास कुटे, नीलेश भोईर, प्रतिभा पोरखकर यांचाही सहभाग होता़सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी इराणी टोळीतील संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी म्हसरुळ पोलीस ठाणे हद्दीत पोलीस बतावणीचे दोन गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच इंदिरानगर येथे दोन, आडगाव व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी एक सोनसाखळी खेचल्याची कबुली दिली़ या इराणी टोळीतील संशयितांकडून १२७ ग्रॅम सोन्याचे दागिने, स्विफ्ट डिझायर कार असा पाच लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकShrirampurश्रीरामपूरCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटक