शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी ‘फुटबॉल फेस्टिव्हल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 23:31 IST

नाशिक : भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात राबविण्यात येणाºया ‘मिशन ११ मिलियन’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. १५) नाशिक जिल्ह्यातदेखील एकाच वेळी फुटबॉल खेळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.शुक्रवारी (दि. १५) होणाºया ‘फुटबॉल फे स्टिव्हल’मध्ये जास्तीत जास्त ...

ठळक मुद्दे‘मिशन ११ मिलियन’ उपक्रम : जिल्ह्यातील १२८१ शाळांचा सहभागजिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांची पत्रकार परिषदेत माहिती

नाशिक : भारतामध्ये आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षाखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात राबविण्यात येणाºया ‘मिशन ११ मिलियन’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. १५) नाशिक जिल्ह्यातदेखील एकाच वेळी फुटबॉल खेळण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.शुक्रवारी (दि. १५) होणाºया ‘फुटबॉल फे स्टिव्हल’मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन राज्याचे शिक्षण तसेच क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी केले असून, या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिक जिल्ह्यातदेखील फुटबॉल वन मिलियन संयोजन समिती आणि नाशिक जिल्हा फु टबॉल असोसिएशन तसेच क्रीडा शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, पुरस्कारार्थी, आंतरराष्ट्रीय खेळाडू, शहरातील क्र ीडा पत्रकार यांच्यासाठी सीबीएस येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सकाळी आठ वाजता तर पंचवटी येथील विभागीय क्र ीडा संकुल येथे सकाळी साडेनऊ फुटबॉल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची यावेळी देण्यात आली.आॅक्टोबर महिन्यात देशभरातील सहा राज्यांमध्ये ही स्पर्धा होणार असून, मुंबईत आॅक्टोबर महिन्यातील ६, ९, १२, १८ आणि २५ या दिवशी सामने होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे ‘११ मिलियन’ या संकल्पनेअंतर्गत समाजामध्ये व्यायाम आणि क्रीडा संस्कृती रुजावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ३० हजार शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी तीन फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहे. नाशिकमधील १२८१ शाळांना या फुटबॉलचे वितरण करण्यात आले असून राज्यात सर्वाधिक शाळांची नोंदणी केलेले शहर म्हणून नाशिक पहिल्या स्थानावर आहे.शुक्रवारी होणाºया स्पर्धेसाठी जिल्ह्यातील विविध मैदानांवर सामन्यांसाठी नियोजन करण्यात आले असून विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी येथे स्पेस अकॅडमी, जेम्स अकॅडमी, ब्रह्मा व्हॅली स्कूल, उन्नती हायस्कूल, स्वामी नारायण स्कूल, स्वामी विवेकानंद स्कूल, महाराष्ट्र हायस्कूल तर सिडको अश्विननगर येथील राजे संभाजी स्टेडिअम येथे सिम्बायसिस स्कूल, केबीएच हायस्कूल, ग्रामोदय हायस्कूल, जनता विद्यालय, सेंट लॉरेन्स स्कूल, मोरवाडी हायस्कूल, उंटवाडी हायस्कूल, मॉडर्न हायस्कूल तसेच देवळाली कॅम्प येथील आनंद रोड मैदान येथे आनंद ऋ षी स्कूल, तक्षशिला विद्यालय, टिबरीवाला स्कूल अशा एकूण अठरा शाळांतील तीन हजार ६०० विद्यार्थी या सामन्यांमध्ये सहभागी होणार असून ‘मिशन ११ मिलियन’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेस जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी नितीन बच्छाव, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अर्जुन टिळे, अविनाश टिळे यावेळी उपस्थित होते.