शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी आणि शाह यांना मराठा जात संपवायची आहे’’, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 21:20 IST

Maratha Reservation: नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामधून मराठा जात संपवायची आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. तसेच जेव्हा टांगा पटली होईल, तेव्हा आमची गरज कळेल, असा इशारा दिला आहे. 

मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावं, अशी मागणी लावून धरत पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आज एक गंभीर आरोप केला आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्रामधून मराठा जात संपवायची आहे, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच जेव्हा टांगा पटली होईल, तेव्हा आमची गरज कळेल, असा इशारा दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थळावरून आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना माध्यमांनी त्यांना अमित शाह यांनी रविवारी पुण्यामधील भाजपाच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाबाबत प्रतिक्रिया विचारली. तेव्हा मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते काय लक्ष घालणार? ते मोठे लोक आहेत. गरीबांकडे लक्ष द्यायला त्यांना कुठे वेळ आहे. जेव्हा टांगे पलटी होतील तेव्हा कळणार आहे. त्यांना केवळ सत्ता स्थापन करेपर्यंत गरीबांची गरज होती. सत्ता स्थापन केल्यावर त्यांनी गरीबांवर लाथ मारलीय. आता मोठे मोठे कावळे ओळखीचे झालेत त्यांच्या त्यांना धरून आहेत ते, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली. 

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे शिर्डीला आले होते तेव्हा त्यांना आरक्षणाच्या प्रश्नामध्ये लक्ष घाला, असं आवाहन आम्ही केलं होतं. मात्र त्यांनी लक्ष घातलं नाही. लोकांचे मुडदे पाडणारे लोक आहेत ते. त्यांचा केवळ चेहरा माणसाचा आहे. ते आतमधून कपटाने भरलेले आहेत. त्यांचं काही खरं नाही. ते गरिबाला कधीच मोठं करणार नाहीत. त्यांना देशातील मोठ्या जाती संपवायच्या आहेत. महाराष्ट्रात मराठा मोठी जात आहे. ती त्यांना संपवायची आहे. गुजरातमध्ये पटेल, तसेच यादव, राजपूत, गुर्जर, जाट, मुस्लिम, दलित अशा मोठ्या जाती संपवायच्या आहेत. ते विचित्र लोक आहेत. मोठ्या जाती संपवायच्या आणि छोट्या जातींना धरून राजकारण करायचं हा त्यांचा पणच आहे. मात्र मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल, हे त्यांना माहिती नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा