शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

 नवरात्रौत्सवातच मोठी घोषणा करणार, नारायण राणेंचे सुतोवाच 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 5:26 PM

गेल्या काही काळापासून नाराज असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नवरात्रौत्सवातच मोठी घोषणा करण्याचे सुतोवाच केले आहेत. आपल्याला विश्वासात न घेता सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी नेमण्यात आल्याने राणे संतप्त झाले आहेत.

मुंबई, दि. 17 - गेल्या काही काळापासून नाराज असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नवरात्रौत्सवातच मोठी घोषणा करण्याचे सुतोवाच केले आहेत. आपल्याला विश्वासात न घेता सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी नेमण्यात आल्याने राणे संतप्त झाले आहेत. तसेच त्यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्र सोडले आहे. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना राणेंनी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर जोरदार टीका करत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नाराणय राणे म्हणाले, काँग्रेसमध्ये गेल्यापासून जिल्ह्यातील कोणताही निर्णय घेताना मला विचारात घेतले जात असे. मात्र यावेळी कोणतीही विचारपूस न करता जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. तसेच नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे."यावेळी काँग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावरही राणेंनी तोफ डागली."सिंधुदुर्गात घडलेल्या घटनाक्रमामागे मोहन प्रकाश आणि अशोक चव्हाण यांचा हात आहे. या दोघांच्या षडयंत्रामुळे काँग्रेस संपवण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्हा परिषद, जिल्हा बँक काँग्रेसच्या ताब्यात असलेला सिंधुदुर्ग हा राज्यातील एकमेव जिल्हा आहे. त्याबरोबर  जिल्हा नियोजन समितीत काँग्रेसचे वर्चस्व आहे, जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समित्या, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतीमध्ये कांग्रेसचे वर्चस्व आहे. ज्या कार्यकर्त्यांमुळे ही सत्ता आली त्या कार्यकर्त्यांनाच घरी बसवण्याचे काम आज काँग्रेसने केले आहे." असे राणे म्हणाले. मास लिडर आहेत त्यांनाच संपवण्याचे कारस्थान काँग्रेसकडून सुरू आहे. मात्र जे लोक काँग्रेसला संपवत आहेत किंवा संपवण्याची सुपारी घेतली आहे त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसमध्ये ज्या अपेक्षेने गेलो होतो त्याबाबतीत माझी निराशा झाली. आता या सर्वप्रकरणाचा सोक्षमोक्ष मी लवकरच लावेन, अगदी नवरात्रौत्सवातच मोठी घोषणा करेन, असे सुतोवाही राणेंनी केले. 

दरम्यान, नारायण राणे सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. काँग्रेसने नवी कार्यकारिणी जाहीर करण्याच्या  घेतलेल्या निर्णयानंतर नारायण राणे प्रथमच जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या जिल्ह्यातील "एन्ट्री" कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता राणे काय भूमिका घेणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. सोमवारी ते कुडाळ येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सोमवारी होणाऱ्या राणेंच्या भाषणाकडे कार्यकर्त्यांसह  अवघ्या  महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नारायण राणे यांचा संभाव्य भाजप प्रवेश गृहीत धरून सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी अखेर काँग्रेसने शनिवारी बरखास्त केली होती. कॉँग्रेसच्या नूतन जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे प्रदेश सदस्य आणि निष्ठावंत विकास सावंत यांची नियुक्ती करण्यात आली होती. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त होणार याची चर्चा गेले काही दिवस सर्वत्र होती. आठवड्यापूर्वी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश काँग्रेसचे नेते जिल्ह्यात त्यावेळी सावंतवाडीत बैठक झाली. या बैठकीत आमदार नीतेश राणे यांनी प्रदेशच्या नेत्यांना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच ही बैठक ‘हायजॅक’ही केली होती.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Indian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसBJPभाजपा