एकीकडे राज्यात मुंबईसह एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे आज कोकणातील सिंधुदुर्गामध्येभाजपाचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी गोव्याच्या सीमेजवळ असलेल्या बांद्यापासून ते कणकवलीपर्यंत राणे समर्थकांनी रॅली काढत आपण राणेंसोबत असल्याचा संदेश दिला. तर नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीवेळी आमने-सामने आलेले भाजपाचे आमदार व मंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे बंधूसुद्धा हसत खेळत एकत्र आलेले दिसले. दरम्यान, कणकवली येथे झालेल्या मेळाव्यातून मला ऊर्जा मिळाली आहे. मतभेद निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका, असं आवाहनही नारायण राणे यांनी केलं.
डिसेंबर महिन्यात झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये मुख्य लढत झाली होती. तसेच या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे आमदार, मंत्री नितेश राणे आणि शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे हे आमने-सामने आले होते. तसेच या निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांमुळे राणे कुटुंबांमध्ये मतभेद झाल्याची चर्चाही सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गात ‘एकच ना.रा.’ असे सूचक बॅनर लागले होते. दरम्यान, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा आणि शिंदेसेनेमध्ये विभागलेल्या राणे समर्थकांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केलं. यावेळी नारायण राणेंचं स्वागत करण्यासाठी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासोबत शिंदेसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हेसुद्धा उपस्थित होते.
दरम्यान, राणे समर्थकांनी बांद्यापासून कणकवलीपर्यंत झालेल्या रॅलीचा कणकवली येथे समारोप झाल्यानंतर झालेल्या मेळाव्याला नारायण राणे यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, आतापर्यंत मी जेवढी पदे घेतली, त्या पदांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. तुम्हीही करू नका. आजच्या या मेळाव्यातून मला ऊर्जा मिळाली आहे. सिंधुदुर्गात मतभेद निर्माण करणाऱ्यांना थारा देऊ नका. माझ्यानंतर निलेश आहे. निलेश आणि नितेश राणे सक्षमपणे जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तसेच भाजपा, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी एकत्र राहावे, असेही आवाहन नारायण राणे यांनी केले.
Web Summary : Narayan Rane showcased strength in Sindhudurg amidst municipal elections. Brothers Nitesh and Nilesh Rane appeared together, ending discord rumors. Rane urged supporters to avoid division and support his sons, advocating for BJP, Shinde Sena, and NCP unity.
Web Summary : नारायण राणे ने नगरपालिका चुनावों के बीच सिंधुदुर्ग में शक्ति प्रदर्शन किया। नितेश और नीलेश राणे एक साथ दिखे, जिससे मनमुटाव की अफवाहें खत्म हो गईं। राणे ने समर्थकों से विभाजन से बचने और अपने बेटों का समर्थन करने का आग्रह किया, भाजपा, शिंदे सेना और एनसीपी एकता की वकालत की।