शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane:"नारायण राणेंचे ते वक्तव्य कटाचा भाग, भूमिका न बदलल्यास त्यांच्याविरुद्ध संघर्ष अटळ’’, आमदार दीपक केसरकर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 11:54 IST

Narayan Rane Vs Deepak Kesarkar : कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र असताना राणेंचे सिंधुदुर्गातील कट्टर प्रतिस्पर्धी दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना थेट इशाराच दिला आहे.

सावंतवाडी - केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटला आहे. हा संघर्ष दिवसेंदिवस अधिकाधिक तीव्र असताना राणेंचे सिंधुदुर्गातील कट्टर प्रतिस्पर्धी दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांना थेट इशाराच दिला आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य हा व्यापक कटाचा भाग आहे. आता नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी अन्यथा त्यांच्याविरोधात राजकीय संघर्ष अटक आहे, असे विधान दीपक केसरकर यांनी केले आहे. ( "That statement of Narayan Rane is part of a conspiracy" MLA Deepak Kesarkar Criticize Narayan Rane)

आज सावंतवाडीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली. तसेच नारायण राणें यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या विधानाचाही समाचार घेतला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल वक्तव्य एका कटाचा भाग असून,  महाराष्ट्रात दंगे घडवण्याचा प्रयत्न असू शकतो. नारायण राणे यांनी जी प्रतिकिया दिली त्याला शिवसैनिकांकडून उलट प्रतिकिया येणार हे त्यांना माहिती होते. मग त्यांना कोणी बोलायला लावले का? असा सवाल केसरकर यांनी केला आहे. दरम्यान, दीपक केसरकर यांनी नारायण राणेंना इशाराही दिला. ते म्हणाले की,  नारायण राणे यांनी आपली भूमिका बदलावी, अन्यथा जिल्ह्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी त्यांच्याविरोधात माझा राजकीय संघर्ष अटळ आहे.  मी माझी   भूमिका १७ तारखेनंतर स्पष्ट करणार आहे. मात्र कोरोना संकटात राणेंकडून जन आशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणे हे येथील जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे, असेही केसरकर म्हणाले.तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट देण्यावरूनही दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला. जिवंतपणी बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांनी आता त्यांच्या स्मारकाला भेट देणे म्हणजे ढोंगीपणा आहे, असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग