शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: "मी देवेंद्र फडणवीसांच्या जागी असतो तर...", सेनेला डिवचताना नारायण राणेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 18:27 IST

Narayan Rane: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारकडून मान राखला जात नसल्याची राणेंची टीका

Narayan Rane: सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं उद्घाटन उद्या केलं जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन सोहळा होणार आहे. त्याआधी नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. चिपी विमानतळाच्या कामात शिवसेनेनं श्रेय घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण विकास प्रकल्पांना यांच्याच नेत्यांनी याआधी विरोध केला आहे. आधी विरोध करायचा आणि प्रकल्प पूर्ण झाले की श्रेय घ्यायला यायचं, ही शिवसेना नेत्यांची वृत्ती असल्याचं नारायण राणे म्हणाले.  

राज्य सरकारनं चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेवरही राणे यांनी निशाणा साधला. निमंत्रण पत्रिकेत राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नसल्याचा निषेध राणे यांनी व्यक्त केला. विरोधी पक्षनेत्याचं नाव छापलेलं नाही याबाबत फडणवीसांशीही बोलणं झाल्याचं राणेंनी यावेळी सांगितलं. फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेवरही राणेंनी मिश्किल टिप्पणी केली. 

नेमकं काय म्हणाले राणे?राज्य सरकारनं चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठीची निमंत्रण पत्रिका पत्रकार परिषदेत सादर केली. यात फडणवीसांच्या नावाचा उल्लेख नसल्याचं आणि त्यांना निमंत्रित केलं गेलं नसल्याच्या मुद्द्यावर राणेंनी भाष्य केलं. "राज्यात कायदेही आहेत आणि इथं प्रथा परंपरेप्रमाणेही राज्य चालत आलं आहे. कायद्याप्रमाणेच महाराष्ट्रात प्रथा परंपरांनाही महत्त्व आहे. राज्य सरकारचा कार्यक्रम आहे. हा काही देसाईंच्या घरचा कार्यक्रम नाही. त्यांच्या मुलाच्या लग्नाचा कार्यक्रम नाही. त्यामुळे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आलं आहे. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचंही नाव हवं होतं. त्यांचाही मान ठेवला गेलाच पाहिजे. पण तो ठेवला गेला नाही. त्यावर कायदेशीर कारवाईची तरतूद नसली तरी या सरकारची निती काय आहे हे जनतेला यातून कळालं आहे", असं नारायण राणे म्हणाले. "याबाबत मी देवेंद्र फडणवीसांशीही बोललो. पण त्यांनी लोकहिताचं काम आहे. त्यामुळे आपण यात काही भूमिका नको घ्यायला असं म्हटलं. पण देवेंद्रजींच्या जागी मी असतो तर आज चित्र वेगळंच असतं. देवेंद्रजी आमचे सहनशील नेते आहेत", अशी मिश्किल टिप्पणी राणे यांनी यावेळी केली. 

विकासाच्या आड कोण येतं ते जनतेला माहीत आहे. सिंधुदुर्गातील जनता त्याची साक्षीदार आहे. उद्घाटनाची परवानगी मी आणली. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन त्यांना उद्घाटनासाठी ८ दिवसांत परवानगी देण्याची विनंती केली. त्यांनी ती तातडीनं मान्य केली आणि ९ ऑक्टोबर तारीख दिली. शिवसेना नेत्यांनी विमानतळासाठी काय केलं, त्यांची औकात काय, असेही प्रश्न राणेंनी विचारले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChipi airportचिपी विमानतळShiv Senaशिवसेना