शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नांदेडमध्ये भाजपला खिंडार; माजी खासदार, माजी आमदार काँग्रेसमध्ये परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 8:07 AM

भाजपला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसची ताकद मात्र वाढली आहे.  

नांदेड : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच त्या मतदारसंघात वर्चस्व असलेले भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी भाजपला जय श्रीराम केला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, काँग्रेसची ताकद मात्र वाढली आहे.  जिल्ह्यात खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या एककल्ली कारभाराला वैतागून आपण पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया खतगावकर यांनी दिली. रविवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली. त्यांच्याबरोबर माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा आणि इतर समर्थकांनीही भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.    तीन वेळेस देगलूर मतदारसंघाचे आमदार आणि तीन वेळेस खासदार असलेले भास्करराव पाटील खतगावकर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपत आले होते. त्यावेळी जिल्हा भाजपची सर्व सूत्रे त्यांच्या हातात होती. परंतु मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रताप पाटील चिखलीकर हे शिवसेनेतून भाजपत आले. भाजपच्या तिकिटावर त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यामुळे पक्षात त्यांचे वजन चांगलेच वाढले होते. ...म्हणून घरवापसीजिल्हा भाजपतील सर्व निर्णय चिखलीकर हेच घेत होते. त्यामुळे खतगावकर गोटात नाराजी होती. देगलूर मतदारसंघ पोटनिवडणुकीत उमेदवार ठरवितानाही खतगावकर यांचे मत विचारात घेतले नाही. याबाबत पक्षनेतृत्वाकडे तक्रार करूनही नेतृत्वाने चिखलीकरांनाच ताकद दिली. त्यामुळे खतगावकर यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये घरवापसीचा निर्णय घेतला. माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या घोषणेचे मी स्वागत करतो. खतगावकरांच्या प्रवेशामुळे मराठवाड्यातील पक्षसंघटनेला अधिक बळकटी मिळेल.   - अशोक चव्हाण, पालकमंत्री, नांदेड

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा