nanar refinery project : भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख घेणार उद्धव ठाकरेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2018 11:45 IST2018-04-25T10:33:55+5:302018-04-25T11:45:22+5:30
नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापलेले असतानाच भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

nanar refinery project : भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख घेणार उद्धव ठाकरेंची भेट
मुंबई - नाणार प्रकल्पावरून राज्यातील राजकारण तापलेले असतानाच भाजपाचे बंडखोर आमदार आशिष देशमुख आज संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास मातोश्रीवर ही भेट होण्याची शक्यता आहे. कोकणातील नाणार येथे नियोजित असलेला तेलशुद्धिकरण प्रकल्प स्थानिकांचा विरोध असल्यास हा प्रकल्प विदर्भाला द्यावा, असे पत्र देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्याने या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत.
नाणार येथील नियोजित तेलशुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला असून, शिवसेनेनेही स्थानिकांची बाजू घेत प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या नाणार दौऱ्यादरम्यान एका सभेला संबोधित करताना हा प्रकल्प कोकणात न उभारता विदर्भ किंवा गुजरातला नेण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी आशिष देशमुख यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राचा उलेखही केला होता. दरम्यान, आज हे दोन्ही नेते भेटणार असल्याने त्यांच्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.