...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 09:30 IST2025-12-09T09:28:42+5:302025-12-09T09:30:29+5:30

माझी बदनामी करण्यासाठी असे कृत्य केले हे त्यांना कुणी सुपारी दिली हे सांगावे. त्या पैशाच्या गड्ड्यांसमोर जर मी दिसलो तर आमदारकीचा राजीनामा देईन असं आव्हान दळवी यांनी दिले आहे.

Nagpur Winter Session 2025: MLA Mahendra Dalvi is angry over the video posted by Ambadas Danve, will resign if the allegations in it are proven | ...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)

...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)

नागपूर - ऐन हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आमदाराचा पैशांच्या गड्ड्यांसह व्हिडिओ समोर आल्याने खळबळ माजली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यात पैशांसह आमदार दिसत असल्याचे त्यांनी आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला. या व्हिडिओत दिसणारे आमदार शिंदेसेनेचे महेंद्र दळवी आहेत. मात्र या व्हिडिओशी माझा संबंध नाही. अंबादास दानवे यांचा ब्लॅकमेलिंग करणे धंदा आहे असं सांगत महेंद्र दळवी चांगलेच भडकले आहेत. हे आरोप सिद्ध झाले तर मी आमदारकीचा राजीनामा देईन असं आव्हानही दळवी यांनी दिले आहे.

ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ

आमदार महेंद्र दळवी म्हणाले की, अंबादास दानवे यांनी हा व्हिडिओ संपूर्ण पोस्ट करावा. त्यात दिसणारा लाल टीशर्टवरील व्यक्ती कोण आहे त्याचा चेहरा दाखवावा. कुणाला तरी ब्लॅकमेल करणे हा अंबादास दानवे यांचा धंदा आहे. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी काय केले हे महाराष्ट्राने पाहिले आहे. आता त्यांच्याकडे कुठले पद नाही. पक्षातही कुणी विचारत नाही. दानवे यांना गांभीर्याने घेत नाही. अधिकृत फोटोसह त्यांनी पुरावे घेऊन नागपूरात यावे हे माझं आव्हान आहे. मात्र एखाद्याची बदनामी करणे हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे. त्यांना कुणी सुपारी दिली हे त्यांनी सांगावे असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच माझी बदनामी करण्यासाठी असे कृत्य केले हे त्यांना कुणी सुपारी दिली हे सांगावे. त्या पैशाच्या गड्ड्यांसमोर जर मी दिसलो तर आमदारकीचा राजीनामा देईन यापेक्षा आणखी काय सांगावे. तो व्यक्ती कोण हे लोकांसमोर आले पाहिजे. या व्हिडिओची सत्यता नाही. निवडणुकीतही असे प्रकार त्यांनी केले. अंबादास दानवे यांच्याकडे पुरावे असतील तर कुठल्याही चॅनेलवर चर्चेसाठी यावे. मी समोर चर्चा करायला तयार आहे. त्यांनी मुख्यमंत्र्‍यांना प्रश्न विचारला, त्याला मुख्यमंत्री आणि आमचे नेते एकनाथ शिंदे नक्की उत्तर देतील असंही आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले.

दरम्यान, अधिवेशन काळात हा जो प्रकार त्यांनी केला हा केवळ बदनामी करण्यासाठी आहे. याच्यामागे कुणीतरी वेगळी शक्ती आहे. जी आम्हाला आणि पक्षाला बदनाम करण्याचं काम करत आहे. दानवेंची मैत्री अनेक जणांसोबत आहे. आमचे काही विरोधक त्यांच्याशी संपर्कात येऊन हे करायला लावले असेल. तो फोटो माझा नाहीच. व्हिडिओ माझा नाही हे त्रिवार सत्य आहे. विधानसभेत हा प्रश्न मी उपस्थित करणार आहे. पुराव्यासकट दानवेंनी पुढे यावे. मी आमदारकीचा राजीनामा देण्यास तयार आहे असं आव्हानही महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवे यांना दिले. 

Web Title : घूसखोरी के आरोपों पर विधायक इस्तीफा देने को तैयार; शामिल होने से इनकार।

Web Summary : विधायक महेंद्र दलवी ने नकदी दिखाते वायरल वीडियो में शामिल होने से जोरदार इनकार किया। उन्होंने अंबादास दानवे पर ब्लैकमेल करने का आरोप लगाया, उन्हें आरोपों को साबित करने या मानहानि के मुकदमे का सामना करने की चुनौती दी। दलवी ने दोषी साबित होने पर इस्तीफा देने का वादा किया।

Web Title : MLA Ready to Resign Over Bribery Allegations; Denies Involvement.

Web Summary : MLA Mahendra Dalvi vehemently denies involvement in a viral video showing cash. He accuses Ambadas Danve of blackmail, challenging him to prove the allegations or face a defamation suit. Dalvi pledges to resign if proven guilty.