शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

नागपूर : अपहरण करून विद्यार्थिनीवर दोन दिवस सामुहिक अत्याचार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 16:51 IST

दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात अडकवल्यानंतर तिला पळवून नेऊन एका आरोपीने सलग दोन दिवस तिच्यावर स्वत: अत्याचार केला. तर, त्याच्या दोन मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केला.

नागपूर : दहावीच्या विद्यार्थिनीला प्रेम जाळ्यात अडकवल्यानंतर तिला पळवून नेऊन एका आरोपीने सलग दोन दिवस तिच्यावर स्वत: अत्याचार केला. तर, त्याच्या दोन मित्रांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने तिला घरी सोडून पळ काढला. पीडित मुलीच्या पालकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी नंदनवन पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी केवळ बलात्काराचा गुन्हा दाखल केला अन् रात्रीपर्यंत त्याबाबत माहिती देण्याचे टाळल्याने नंदनवन पोलीस आरोपींच्या पिंज-यात सापडले आहे. 

या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव विजय (२२) आहे. तो  नंदनवनमधील शास्त्रीनगरात राहतो. त्याच्या घराशेजारी १५ वर्षीय विद्यार्थिनी राहते. ती दहावीची विद्यार्थिनी आहे. गरीब परिवारातील  या मुलीला आरोपी विजयने थोडीफार आर्थिक मदत करून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने तिला प्रेमपाशात ओढले.  सोमवारी दुपारी १ वाजता तिला दुचाकीवरून बसवून फिरवले. त्यानंतर स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा कुंभारटोलीतील एका मित्राच्या रूमवर नेऊन सलग दोन दिवस अत्याचार केला. संधी साधून त्याच्या दोन मित्रांनीही नंतर तिच्यावर अत्याचार केला. बुधवारी दुपारी १२ वाजता आरोपीने तिला घरी सोडून दिले आणि पळून गेला. दोन दिवस बेपत्ता मुलीच्या शोधात अस्वस्थ झालेल्या पालकांनी तिला विचारणा केली असता हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर पालकांनी मुलीला नंदनवन ठाण्यात नेले.  मुलीच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, हे प्रकरण बलात्काराचे नव्हे तर सामुहक बलात्काराचे असल्याची जोरदार चर्चा पसरल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. 

पोलिसांचे उलटसुलट प्रश्न

अल्पवयीन मुलीच्या अपहरण आणि सामुहिक बलात्काराचे हे प्रकरण नंदनवन पोलिसांनी प्रारंभी फारच सहजतेने घेतले. पालकांना आणि तिला उलटसुलट प्रश्न करून हुसकावण्याचा प्रयत्न केल्याचेही समजते. मुलीच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वरिष्ठांकडे जाण्याचा पवित्रा घेतल्यामुळे  पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरण आणि बलात्कार तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचे पूर्ण नाव सांगण्यासही टाळाटाळ केली. माहिती कक्षातही आरोपीचे पूर्ण नाव कळविले नाही.  रात्री सामुहिक बलात्काराची चर्चा पसरल्यानंतर गुन्हा दाखल करणाºया  पोलीस उपनिरीक्षकांच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाnagpurनागपूर