Nagpur Monsoon Session: ...अन् चिडलेले शिवसेना आमदार थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात धडकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 15:37 IST2018-07-04T15:04:38+5:302018-07-04T15:37:50+5:30
शिवसेनेचे संतप्त आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनात

Nagpur Monsoon Session: ...अन् चिडलेले शिवसेना आमदार थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात धडकले!
नागपूर: विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेचा सामना करावा लागला आहे. विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यानं संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. विकासकामांना निधी देण्याची मागणी यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केली. दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची कबुली दिलेली असतानाही तो निधी मिळत नसल्यानं शिवसेना आमदार संतप्त झाले.
विधीमंडळ अधिवेशनाला आजपासून नागपूरात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना शिवसेना आमदारांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेच्या विधानसभेतील आमदारांनी केली. वर्षभर पाठपुरावा करुनही विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचं आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन आमदारांनी त्यांचा संताप व्यक्त केला. विकासकामांसाठी निधी न मिळाल्यास विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशारादेखील या आमदारांनी दिला.