My style will not be seen in clothing or in makeup - Chetan Bhagat | माझी स्टाईल कपड्यात किंवा मेकअपमध्ये नाही भेटणार विचारात दिसेल - चेतन भगत
माझी स्टाईल कपड्यात किंवा मेकअपमध्ये नाही भेटणार विचारात दिसेल - चेतन भगत

मुंबई - माझी स्टाईल कपड्यात किंवा मेकअपमध्ये नाही भेटणार विचारात दिसेल. मी लिखाणात स्टाईल ठेवतो असं लेखक चेतन भगत बोलले आहेत. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्यात चेतन भगत बोलत होते. 'कुठलाही पेपर आता सोसायटीचा भाग आहे. लोकमतचं हे काम उत्तम. लोकमतला जसं महाराष्ट्रात यश तसंच दिल्लीत पण मिळेल असं सांगत त्यांनी शुभेच्छाही दिल्या. 

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती.  मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. 

यावेळी बोलताना अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी आपल्या स्टाईलचा उलगडा केला. आपण वडिलांना धोतर नेसताना पाहून स्टाईल शिकलो असा उलगडा त्यांनी केला. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेत्री हा पुरस्कार देण्यात आला. जॅकी श्रॉफ यांनी यावेळी राम राम नमस्कार कसे आहात असे विचारच मराठीत संवाद साधण्यास सुरुवात केली. 

जॅकी श्राफ यांना त्यांची स्टाईल कुठून आली ? असे विचारले असता त्यांनी आपल्या स्टाईलबद्दलचा उलगडा केला. 'लहानपणी वडिलांना धोतर नेसताना पाहिले आणि त्यांची ती स्टाईल अवगत केली. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते आणि त्यातच वेगळपण असते', असं जॅकी श्रॉफ यांनी यावेळी सांगितलं.  

लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे. 

ट्रॉफीही स्टायलिश
महाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरुष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्य रुपी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे़ अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही.
 


Web Title: My style will not be seen in clothing or in makeup - Chetan Bhagat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.