"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:38 IST2025-06-27T18:33:19+5:302025-06-27T18:38:54+5:30

फर्टिलिटी सेंटरने मुलाचे स्पर्म देण्यास नकार दिल्यानंतर, मृत तरुणाच्या आईने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे...

My son is dead, now at least give me his sperm mother's demand to the Mumbai High Cour hc asks fertility centre to preserve frozen sample | "माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

एका मृत तरुणाचे फ्रीज करून ठेवलेले वीर्य (स्पर्म) तोवर सुरक्षित करून ठेवावे, जोवर त्याच्या आईने केलेल्या याचिकेवर निकाल येत नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एक एक फर्टिलिटी सेंटरला दिला आहे. खरे तर, याचिकाकर्ता महिलेच्या मुलाचा कन्सरमुळे मृत्यू झाला आहे. कॅन्सरचा सामना करताना संबंधित तरुणाने आपले वीर्य (स्पर्म) फ्रीज करून ठेवले होते. मात्र, संबंधित तरुणाच्या मृत्यूनंतर, फर्टिलिटी सेंटरने त्याच्या आईला ते स्पर्म देण्यास नकार दिला आहे.

"सुनावणीपूर्वी हे वीर्य खराब झाले, तर..." -
फर्टिलिटी सेंटरने मुलाचे स्पर्म देण्यास नकार दिल्यानंतर, मृत तरुणाच्या आईने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दरम्यान, सुनावणीपूर्वी हे वीर्य खराब झाले, तर याचिकेचा उद्देश व्यर्थ ठरेल. यामुळे हे वीर्य सुरक्षित ठेवण्यात यावे, असे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी म्हटले आहे.

फ्रीज करून ठेवलेले स्पर्म सॅम्पल का देत नाहीये फर्टिलिटी सेंटर? -
संबंधित महिलेने याचिकेत म्हटले आहे, "आपल्या मुलाला कॅन्सरचे निदान झाल्यनंतर, ऑन्कोलॉजिस्टने त्याला त्याचे वीर्य फ्रीज करण्याचा सल्ला दिला होता. कारण केमोथेरेपीने नपुंसकतेची शक्यता होती. मात्र, मुलाने कुटुंबीयांसोबत कसल्याही प्रकारची चर्चा न करता, एका फॉर्ममध्ये, आपल्या मृत्यू पश्चात वीर्य नष्ट करण्यात यावे, असा पर्याय निवडला होता. यानंतर, १६ फेब्रुवारी रोजी कुठल्याही प्रकारचे मृत्यूपत्र मागे न ठेवता त्याचा मृत्यू झाला."

Web Title: My son is dead, now at least give me his sperm mother's demand to the Mumbai High Cour hc asks fertility centre to preserve frozen sample

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.