शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

माझा मतदारसंघ ‘कऱ्हाड दक्षिण’च

By admin | Updated: September 15, 2014 04:32 IST

मला सेफ मतदारसंघ सापडत नाही या विरोधकांनी उठविलेल्या वावड्या आहेत. माझी उमेदवारी केंद्रीय समितीच नंतर जाहीर करेल;

कऱ्हाड : मला सेफ मतदारसंघ सापडत नाही या विरोधकांनी उठविलेल्या वावड्या आहेत. माझी उमेदवारी केंद्रीय समितीच नंतर जाहीर करेल; पण माझा मतदारसंघ कऱ्हाड दक्षिणच आहे, असे सूतोवाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी केले. तर दुसरीकडे, कऱ्हाड दक्षिणमधून काँग्रेसने उमेदवारी नाकारली तरी आपण रिंगणात उतरणार असल्याची घोषणा आमदार विलास पाटील उंडाळकर यांनी नवी मुंबईत केली.आचारसंहिता लागू झाल्यानंतर रविवारी प्रथमच मुख्यमंत्री चव्हाण कऱ्हाड दौऱ्यावर आले होते. त्या वेळी निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागांचा निर्णय येत्या दोन दिवसांत होईल. आमच्या उमेदवार निवडीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. आघाडी करीत असताना जागांसाठी थोडी ओढाताण होतच असते; पण त्यामध्ये सन्मानाने तडजोड होईल. कारण दोन्ही काँग्रेसने एकत्रित जावे, अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे. काही जागांची अदलाबदल होईल का, याबाबत विचारले असता, अगोदर कोणाला किती जागा, याचा आकडा तरी ठरू द्या. सोमवारी आपण दिल्लीला जात आहोत; मात्र दिल्लीतील बैठक वेगळी आहे आणि सोमवारी यादी जाहीर होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘सर्वेक्षणात मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या पसंतीची टक्केवारी वाढत चालली आहे. त्याप्रमाणे जागांची संख्याही वाढत जाईल,’ असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)