शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
2
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
3
'गुंडांना जामीन, नेत्यांना जमीन', व्हिडीओ शेअर करत रोहित पवारांचा सीएम देवेंद्र फडणवीस यांना सवाल
4
शाह-शिंदेंची दिल्लीत भेट, चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुती...”
5
'पीएम किसान' योजनेचे फिल्टर थांबेनात; २१ व्या हप्त्यासाठी ६.१० लाख लाभार्थी झाले बाद
6
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
7
ते जीव वाचवण्यासाठी तडफडले पण कुणाला कळलंही नाही; थंडी लागू नये म्हणून शेकोटीसाठी कोळसा घेऊन आले अन्…
8
"कोणीतरी दिल्लीला गेलंय, बाबा मारलं म्हणून रडत"; अमित शाहांच्या भेटीवरुन उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
9
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टरने अडीच वर्षीय मुलाच्या डोळ्याजवळील जखमेवर लावलं फेविक्विक
10
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
11
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
12
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
13
Pharmacy Colleges: फार्मसी कॉलेजांना 'नो ॲडमिशन'! प्रवेशाविना १५ हजारांहून अधिक जागा रिकाम्या
14
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
15
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
16
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
17
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
18
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
19
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
20
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 13:08 IST

Eknatj Shinde Meet Amit Shah: भाजपा आणि शिंदे गटात फोडाफोडीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदेंनी तक्रारींचा पाढा वाचल्याचे तर अमित शाहांनी एकनाथ शिंदे यांना धीर देत मोठं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीदरम्यान, राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदेगट या घटक पक्षांनी एकमेकांचे नेते आणि कार्यकर्त्यांची फोडाफोड करण्याचा सपाटा लावल्याने महायुतीमध्ये सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. भाजपाकडून सुरू असलेल्या फोडाफोडीमुळे नाराज असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीलाच दांडी मारली. ही मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेली असता उलट फडणवीसांनीच शिंदे गटाने केलेल्या फोडाफोडीचा पाढा वाचत या नेत्यांचीच कोंडी केली होती. त्यानंतर भाजपा आणि शिंदे गटात फोडाफोडीवरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी बुधवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी शिंदेंनी तक्रारींचा पाढा वाचल्याचे तर अमित शाहांनीएकनाथ शिंदे यांना धीर देत मोठं आश्वासन दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमित शाहांची भेट घेतल्यावर एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंनी केलेल्या तक्रारी ऐकल्यावर अमित शाह यांनी महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष आहे. तुम्ही एनडीएतील प्रमुख नेते आहात. तुमचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल, असे सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. 

दरम्यान,  अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिंदे गटाच्या नेत्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यापुढच्या काळात शिवसेनेचा धनुष्यबाणाचा जो पदाधिकारी असेल त्याला भाजपात घ्यायचे नाही आणि भाजपाचा पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही असे स्पष्ट आदेश आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ही कार्यवाही आमच्या पक्षात सुरू झाली आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. आता यावर महाराष्ट्र भाजपाकडून  काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.     

English
हिंदी सारांश
Web Title : Amit Shah assures Eknath Shinde of attention amid coalition tensions.

Web Summary : Eknath Shinde met Amit Shah due to tensions in the Mahayuti coalition over poaching. Shinde complained about BJP leaders; Shah assured him of due respect and attention to Maharashtra's affairs. Shinde instructed his leaders to halt poaching from BJP.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMahayutiमहायुती