शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
3
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
4
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
5
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
6
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
7
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
8
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
9
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
10
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
11
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
12
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
13
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
14
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
15
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
16
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
17
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
18
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
19
एका दिवसात १ लाख कोटींचा धुराळा! टाटांच्या 'या' कंपनीचा शेअर धडाम; संक्रांतीपूर्वीच गुंतवणूकदारांना 'धक्का'
20
ना भिंतीवर पोस्टर, ना रॅली, ना फ्लेक्सबाजी; जपानची निवडणूक पद्धत पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:30 IST

Municipal Election News: भारतीय जनता पक्ष आणि असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदू-मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली।

चंद्रपूर/मुंबई -  भारतीय जनता पक्ष आणि असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष हे धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राजकीय स्वार्थ साधत आहेत. हिंदू-मुस्लीम, मराठा-ओबीसी वाद निर्माण करून जनतेची माथी भडकवतात आणि सत्तेसाठी मात्र एकत्र येतात. हिरव्या पतंगाचा मांजा भगवा आहे तर धनुष्याचा बाण हिरवा आहे. या ढोंगी भाजपा, शिंदेसेना व एमआयएमला महानगरपालिका निवडणुकीत धडा शिकवा व काँग्रेसला बहुमताने विजयी करा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

यावेळी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भारतीय जनता पक्ष व ओवैसी यांचा एमआयएम पक्ष दोघेही हिंदू मुस्लीमच्या नावावर लोकांमध्ये दहशत माजवत आहेत पण सत्तेची मलई खाण्यासाठी मात्र एकत्र येतात हे दिसून आले आहे. अकोट मध्ये भाजपा व एमआयएम सत्तेसाठी एक झाले. एमआयएमशी युती कधीच करणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छाती ठोकून सांगतात पण अकोटमधील युती काही तोडत नाहीत व त्यांच्यावर कारवाईही करत नाहीत, कारण हे दोन्ही पक्ष एकच आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, या सत्तेच्या साठमारीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही मागे नाही, त्यांनीही बीड जिल्ह्यात परळी नगरपालिकेत एमआयएमचा हात हाती घेतला. जनतेमध्ये दहशत माजवून सत्तेसाठी गळ्यात गळे घालणाऱ्या या ढोंगी लोकांना आता धडा शिकवा, असे आवाहन करताना सपकाळ म्हणाले की, "तू इधर उधर की न बात कर, मुझे रहज़नों से गिला तो है, पर तेरी रहबरी का सवाल है", अशी टीकाही सपकाळ यांनी केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP, Shinde Sena, and MIM are the same: Harshvardhan Sapkal

Web Summary : Harshvardhan Sapkal criticizes BJP, Shinde Sena, and MIM for exploiting religious issues for political gain and uniting for power. He accuses them of deceiving the public and urges voters to support Congress in the upcoming elections, citing alliances in Akot and Parli as evidence of their hypocrisy.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६congressकाँग्रेसHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळ