शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून अखेर गैरहजेरीवर सारवासार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 08:15 IST

Maharashtra Politics: अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले  अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती.

- शिवाजी पवार  शिर्डी : अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले  अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती. मात्र ते आल्याने बरे झाल्याची भावना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलून दाखविली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या शिबिरातील भाषणामुळे त्यांच्याविषयी सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मोठ्या यशानंतर शिर्डीत दोन दिवस पक्षाचे शिबिर पार पडले. समारोपाच्या सत्रामध्ये उपमुख्यमंत्री पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी संघटनात्मक बांधणीवर भर दिला. फुले, शाहू, आंबेडकर यांच्याच विचारांवर पक्षाची वाटचाल सुरू राहील. धर्मनिरपेक्ष विचारांशी कोणतीही तडजोड केली जणार नाही, याचा पुनरुच्चार तीनही नेत्यांनी केला.

‘त्या’ महिलांबाबत विचारलाडकी बहीण योजना ही गोरगरीब घटकातील महिलांना डोळ्यांसमोर ठेवून सुरू केली. मात्र करदाते, नोकरदार तसेच ऊस उत्पादक महिलांबाबत वेगळा विचार करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

महामंडळांवर नियुक्त्याविविध महामंडळांवर लवकरच नियुक्त्या केल्या जातील. त्यासाठी राष्ट्रवादीकडून तटकरे, भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, तर शिंदेसेनेकडून उदय सामंत एकत्रित बसून निर्णय घेतील, असेही अजित पवार म्हणाले.  

‘मी अभिमन्यू नाही, अर्जुन’ बिनबुडाचे कितीही आरोप करून मला अडकविण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यात त्यांना यश येणार नाही. कारण मी अभिमन्यू नाही, तर मी अर्जुन आहे, अशा शब्दांत मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणावर भाष्य केले.  महायुतीतील नेत्यांकडूनच मला टार्गेट केले जात असल्याचे वाईट वाटते. मात्र, वस्तुस्थितीची जाणीव असल्याने  पक्ष म्हणून अजित पवार माझ्या पाठीशी उभे आहेत. २०१९ साली पहाटेची शपथ घेऊ नका, हे षड्यंत्र आहे, हे मी अजित पवार यांना सांगितले होते. शपथ त्यांनी घेतली, पण शिक्षा मात्र मला मिळाली, अशी खंतही मुंडे यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेChhagan Bhujbalछगन भुजबळ