शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

मुंडेंच्या श्रद्धांजलीवरून कामकाज दोनवेळा तहकूब

By admin | Updated: June 5, 2014 22:28 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना श्र्द्धांजली वाहणारी भाषणे सभागृहात व्हावीत की नाही यावरून वाद निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज गुरुवारी दोनवेळा तहकूब करावे लागले.

मुंबई : भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना श्र्द्धांजली वाहणारी भाषणे सभागृहात व्हावीत की नाही यावरून वाद निर्माण झाल्याने विधानसभेचे कामकाज गुरुवारी दोनवेळा तहकूब करावे लागले. सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच भाजपाचे ज्येष्ठ सदस्य गिरीश बापट यांनी मुंडे यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणे अनेक सदस्यांना करायची असल्याने त्यास अनुमती द्यावी, अशी मागणी अध्यक्ष दिलीप वळसे -पाटील यांच्याकडे केली. भाजपाचेच देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे रवींद्र वायकर आणि मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी ही मागणी लावून धरली.मुंडे यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. मात्र, त्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव सभागृहाचे नेते मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी सभागृहात मांडला होता आणि तो मंजूरही करण्यात आला. तेव्हा विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये शोकसभा घ्यावी,असा प्रस्ताव या आधीही आला होता, असे सांसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.मुंडे यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्याची संधी परंपरा बाजूला ठेवून दिली पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली. सांसदीय कामकाज मंत्र्यांनी आपल्या दालनात सत्तापक्ष आणि गटनेत्यांची बैठक घेऊन तोडगा काढावा, असे अध्यक्ष वळसे पाटील यांनी सांगितले आणि कामकाज दुपारी १२ पर्यंत तहकूब केले. त्यानंतरही निर्णय न होऊ शकल्याने कामकाज आणखी अर्धा तासासाठी तहकूब करण्यात आले. शेवटी अध्यक्षांच्या दालनात बैठक होऊन तोडगा काढण्यात आला. आता मुंडे यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणे शुक्रवारी सभागृहात होतील, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आणि कामकाजाला सुरुवात झाली. (विशेष प्रतिनिधी)