मुंबईकरांची सकाळ होतेय थंडा थंडा कूल कूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 06:11 IST2019-12-17T06:10:56+5:302019-12-17T06:11:02+5:30

उस्मानाबादचे किमान तापमान १३.९ सेल्सिअस : मुंबईत किमान तापमान १९ अंशांवर

Mumbaikars are getting cold in the morning | मुंबईकरांची सकाळ होतेय थंडा थंडा कूल कूल

मुंबईकरांची सकाळ होतेय थंडा थंडा कूल कूल

मुंबई : सोमवारी मुंबईच्या सांताक्रुझ वेधशाळेत किमान तापमान १९.८ अंश नोंदविण्यात आले आहे.
राज्यात सर्वात कमी किमान तापमान उस्मानाबाद येथे १३.९ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. राज्यात कमालीचा गारठा जाणवायला लागला आहे. तसेच, सोमवारपासून मुंबईत थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची सकाळ थंडा थंडा कूल कूलने
सुरू होते.
गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे होते.
मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही भागात व मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात लक्षणीय वाढ झाली आहे. तर विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे.
राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. तर, १७ ते २० डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहणार आहे. मंगळवारसह बुधवारी मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
शहरांचे किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये
च्पुणे-१५.६, च्जळगाव - १७.६
च्महाबळेश्वर - १४.५
च्नाशिक-१६.०, च्सातारा-१५.८
च्उस्मानाबाद - १३.९
च्औरंगाबाद - १५.७
च्नागपूर-१६.५ च्वाशिम-१५.८
च्यवतमाळ - १७.०

 

Web Title: Mumbaikars are getting cold in the morning