शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल वसूलीचा तपास होणार; तीन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे कॅगला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 14:32 IST

High Court : राज्य सरकारलाही भूमिका मांडण्याचे निर्देश

ठळक मुद्देराज्य सरकारलाही भूमिका मांडण्याचे निर्देशटोल वसूली बंद करण्यासाठी दाखल करण्यात आली होती जनहित याचिका

मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसू्लीच्या सखोल चौकशीचे आदेश कॅगला दिले आहेत. यापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा खर्च अद्यापही वसूल झाला नाही याबाबत न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं. यापूर्वी उच्च न्यायायलात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं. परंतु न्यायालयानं यावर नाराजी व्यक्त केली. यामध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या निर्मितीसाठी किती खर्च आला आणि प्रत्येक वर्षी त्याच्या देखभालीसाठी किती खर्च केला जातो याचा उल्लेखही करण्यात आला नव्हता. 

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारनं मुदतवाढ मागितली. 'कॅग'ला यांसदर्भात तीन आठवड्यांत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले. राज्य सरकारलाही तीन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश यावेळी न्यायालयानं दिले. मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते प्रविण वाटेगांवकर यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसूली बंद करण्यासाठी एक जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर गुरूवारी न्यायालयात सुनावणी पार पडली. कंत्राटदारानं मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसूलीमधून निर्धारित रकमेपेक्षा अधिक टोल वसूली केली आहे. यासाठीच टोल वसूली बंद करण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली. बुधवारीदेखील मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. 

२२,३७० कोटी रूपयांची वसूली बाकी : एमएसआरडीसीयारम्यान, अद्याप मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खर्चाची रक्कम पूर्णपणे वसूल झाली नसल्याचं एमएसआरडीसीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. एमएसआरडीसीला अद्यापही २२ हजार ३७० कोटी रूपयांची रक्कम वसूल करणं शिल्ल आहे. यामुळे २०३० पर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टोल वसूली कायम राहणार असल्याचं त्यांनी बुधवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितलं. 

दरम्यान, एमएसआरडीसीनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी किती खर्च आला याचा उल्लेखदेखील केला नसल्याचं न्यायालयानं निदर्शनास आणून दिलं. तसंच आतापर्यंत ही रक्कम वसूल झाली नाही यावर विश्वास करणं कठिण असल्याचंही न्यायालयानं म्हटलं. यावेळी न्यायालयानं या प्रकल्पाबाबत कॅगच्या अहवालात देण्यात आलेल्या माहितीवरही लक्ष वेधलं. याशिवाय महाधिवक्ता आणि अॅडिशनल सॉलिसिटर जनलर यांचं म्हणणंही ऐकून घेतलं जाणार असून त्यानंतर पुढील निर्देश देण्यात येणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं.

टॅग्स :MumbaiमुंबईPuneपुणेHigh Courtउच्च न्यायालयMaharashtraमहाराष्ट्रhighwayमहामार्गtollplazaटोलनाका