महामुंबईत थंडा थंडा कुल कुल, हवेचा दर्जाही सुधारला; उर्वरित महाराष्ट्रात विशेष बदल जाणवणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 08:52 IST2025-02-12T08:52:34+5:302025-02-12T08:52:59+5:30

पहाटेचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा जवळपास १ ते २ने अधिक राहूनही महाराष्ट्रात, चढ - उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत केवळ गारवा जाणवला. 

Mumbai is cold, air quality has also improved; Rest of Maharashtra will not experience any significant change | महामुंबईत थंडा थंडा कुल कुल, हवेचा दर्जाही सुधारला; उर्वरित महाराष्ट्रात विशेष बदल जाणवणार नाही

महामुंबईत थंडा थंडा कुल कुल, हवेचा दर्जाही सुधारला; उर्वरित महाराष्ट्रात विशेष बदल जाणवणार नाही

मुंबई - उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याला अटकाव झाल्याने मुंबईतील थंडी कमी झाली होती. मात्र, गार वाऱ्याचा अडथळा दूर झाला असून, हे गारे वारे नाशिक, ठाणे, नवी मुंबई व मुंबईच्या दिशेने वाहणार आहेत. त्यामुळे पारा चढलेल्या मुंबईच्या तापमानात घट होणार असून, पुढील काही दिवस मुंबई - ठाण्यात ‘थंडा थंडा कुल कुल’ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच हवेचा दर्जा आता सुधारला आहे. 

शेवटच्या आठवड्यापासून विशेष खास अशी थंडी जाणवली नाही. पहाटेचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा जवळपास १ ते २ने अधिक राहूनही महाराष्ट्रात, चढ - उताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेस हवेत केवळ गारवा जाणवला. 

आता मुंबई शहर, ठाणे, खान्देश, नाशिकमध्ये तसेच अकोला, छ. संभाजीनगर जिल्ह्यात १३ फेब्रुवारीपर्यंत व १७ व १८ फेब्रुवारी रोजी किंचित थंडीची शक्यता जाणवते. उर्वरित महाराष्ट्रात विशेष बदल जाणवणार नाही, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

किमान तापमान
मुंबई    १८.८ 
अलिबाग    १७.५ 
रत्नागिरी    २०.२ 

Web Title: Mumbai is cold, air quality has also improved; Rest of Maharashtra will not experience any significant change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान