शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई सेंट्रल आगार हिट लिस्टवर

By admin | Updated: May 25, 2014 05:46 IST

एसटीचे मुंबई सेंट्रल आगार हे दहशतवाद्यांच्या लिस्टवर असल्याचे उघड झाले आहे

सुशांत मोरे, मुंबई - एसटीचे मुंबई सेंट्रल आगार हे दहशतवाद्यांच्या लिस्टवर असल्याचे उघड झाले आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या आणि मास्टरमार्इंड दहशतवादी यासिन भटकळला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाच्या गोष्टी बाहेर आल्या आहेत. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासिन भटकळने मुंबई सेंट्रल आगाराचीदेखील पाहणी केली होती. भटकळच्या चौकशीतून ही बाब उघड झाल्यानंतर पोलिसांकडून मुंबई सेंट्रल डेपोत येणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एसटी महामंडळाला उपायोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र सुस्त असलेल्या एसटी महामंडळाने सुरक्षेविषयी कुठलेही कठोर पाऊल उचलले नसल्याचेच दिसते. एसटी महामंडळाची २४७ आगार आणि ५७0 बस स्थानके आहेत. आगारांमध्ये मुंबईत परेल, कुर्ला नेहरू नगर आणि एसटीच्या मुख्यालयाला लागूनच मुंबई सेंट्रल आगार असून, गर्दीच्या काळात या तीनही आगारांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तीनही आगारांमध्ये डोअर मेटल डिटेक्टर असले तरी बहुतांश वेळा ते बंदच असतात. तर या डोअर मेटल डिटेक्टरमधून एखादी संशयित व्यक्ती गेल्यास ते पाहण्यासाठीदेखील एसटीचे सुरक्षारक्षक नाहीत. त्याचप्रमाणे सीसीटीव्हींचीही बोंब आहे. फक्त उद्घोषणा करण्यापलीकडे एसटी महामंडळाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न आता पडत आहे. मागील वर्षाच्या आॅगस्ट महिन्यात दहशतवादी यासिन भटकळला अटक करण्यात आली. त्याच्या अटकेनंतर केलेल्या चौकशीत अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होत आहेत. भटकळने मुंबईत अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी (पाहणी) केली होती. यात मुंबई सेंट्रल आगाराचाही समावेश असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मुंबई पोलिसांना या डेपोच्या सुरक्षेबाबत एसटी महामंडळाशी सहकार्य करण्यास सांगतानाच सुरक्षेच्या सूचनाही महामंडळाला करण्यास सांगितले. त्यामुळे नागपाडा पोलीस स्टेशनने यासंदर्भात एसटी महामंडळाशी बैठक घेऊन सुरक्षेच्या उपाय करण्याच्या सूचना केल्या. मात्र या सूचना करूनही महामंडळाने प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत केवळ स्वत:च्या मुख्यालयासाठी डोअर मेटल डिटेक्टर आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. हे पाहता एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुरक्षेबाबत किती सुस्त आहे, हेच दिसून येते.