Mumbai: राणीच्या बागेतील २५ प्राण्यांचा वर्षभरात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:00 IST2025-09-06T14:59:07+5:302025-09-06T15:00:03+5:30
Mumbai: वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

Mumbai: राणीच्या बागेतील २५ प्राण्यांचा वर्षभरात मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालयात वर्षभरात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी सहा प्राण्यांचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला आहे, तर अन्य प्राण्यांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाला आहे. त्यामुळे प्राण्यांचे वाढते आजार हा चिंतेचा विषय बनला आहे. प्राणिसंग्रहालयात एका वर्षात २५ प्राण्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा प्राण्यांचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला आहे, तर सर्वाधिक म्हणजे १० पेक्षा जास्त प्राण्यांचा मृत्यू हृदयविकार व श्वसनासंबंधी आजारांमुळे झाल्याचे समोर आले आहे. या आकडेवारीनंतर प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे. प्राण्यांमध्ये अशा प्रकारचे आजार का वाढत आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
वृद्धापकाळामुळे मृत प्राणी
११ नोव्हेंबर २०२४ रोजी एका मादी हत्तीणीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे कारण वृद्धापकाळ व पोटातील गाठ, असे नमूद करण्यात आले. २ फेब्रुवारी २०२५ रोजी एका मगरीचा, याशिवाय दोन पोपट, एक पट्टेरी हायना आणि एक बगळा यांचाही वृद्धापकाळाने मृत्यू झाला.
वन्यजीवप्रेमींची चिंता
प्राण्यांच्या या मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. वृद्धापकाळ आणि नैसर्गिक कारणांपलीकडे हृदयविकारासारख्या झटक्यांमुळे झालेले मृत्यू टाळण्यासाठी प्रशासनाने आरोग्य तपासण्या व वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू
स्पॉटेड डिअर, बार्किंग डिअर, सांबर, हरण, पेंटेड स्टॉर्क, बगळे व कासवे, अशा अनेक प्राण्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. या काळात एकट्या हरणांच्या प्रजातींमध्येच ११ मृत्यू झाले असून त्यातील बहुतेकांना कार्डिॲक शॉक किंवा श्वसन विकार कारणीभूत ठरले.