आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:42 IST2025-06-10T12:42:04+5:302025-06-10T12:42:30+5:30

MBBS Student Dies By Suicide In Mumbai: ग्रँट मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

Mumbai: 22-Year-Old Grant Medical College MBBS Student Dies By Suicide At JJ Hospital Hostel | आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहात ग्रँट मेडिकल कॉलेजमधील एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. आर्थिक अडचणी आणि शैक्षणिक ताणतणावामुळे संबंधित विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी जेजे मार्ग पोलिसांत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आला. 

रोहन रामफेर प्रजापती, असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहन हा जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील पाचव्या मजल्यावरील खोली क्रमांक १९८ मध्ये राहायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याच्या खोलीत छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याला ताबडतोब जेजे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी वसतिगृहातील विद्यार्थी आणि वर्गमित्रांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 

आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा
भारतात आत्महत्या करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लोक मानसिक तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. पण प्रत्येक समस्येचे निवारण होऊ शकते. कोणतीही समस्या किंवा अडचण असल्यास सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार आपल्या डोक्यातून काढून टाका. समस्यावर कसा तोडगा काढता येईल? याकडे लक्ष द्या. याशिवाय, आपल्याकडून नकळत कोणतीही चूक झाली असेल तर, घाबरू नका. घरातील थोर आणि जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील.

Web Title: Mumbai: 22-Year-Old Grant Medical College MBBS Student Dies By Suicide At JJ Hospital Hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.