शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:58 IST

MSRTC Employee: राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ८५ हजार कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ८५ हजार कर्मचाऱ्यांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपयांचा बोनस आणि वेतनवाढीचा फरक वेतनासोबत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला . या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

कर्मचाऱ्यांना मिळणार ‘ट्रिपल बेनिफिट’

१) बोनस: सर्व ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ६ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे. यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे.

२) थकबाकी: सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम आता कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत दिली जाणार आहे. यासाठी शासनाने दरमहा ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

३) अग्रीम (उचल): सण अग्रीम घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपये इतका अग्रीम पूर्वीप्रमाणेच देण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाने शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यावर भर: एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली पाहिजे, यावर भर दिला. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध करणे गरजेचे आहे. यासाठी महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या बैठकीला उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : ST Employees' Diwali Delight: Bonus, Arrears, and Advance!

Web Summary : ST employees celebrate a triple Diwali treat! They will receive a ₹6,000 bonus, arrears with monthly salary, and ₹12,500 advance. The government approved ₹51 crore for the bonus. This move aims to boost employee morale and support ST's financial stability.
टॅग्स :state transportएसटीEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीDiwaliदिवाळी २०२५