MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:43 IST2026-04-08T17:42:30+5:302026-04-08T17:43:03+5:30

MPSC Result: एमपीएससी परीक्षेत सोलापूरच्या विजय लामकाने राज्यात प्रथम आला आहे तर, आरती जाधव ही महिलांमध्ये अव्वल आली आहे. 

MPSC Result Declared: Solapur's Vijay Lamkane and Aarti Jadhav Top the State | MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल

MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल

सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २७ ते २९ मे, २०२५ या कालावधीत घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल ८ एप्रिल, २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार विविध २० संवर्गातील एकूण ४६१ पदांवर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्हातील विजय नागनाथ लामकाने (६२४ गुण) हे सर्वसाधारण तथा इतर मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम तर सोलापूर जिल्ह्यातील आरती परमेश्वर जाधव (६०१) या महिलांमधून राज्यात प्रथम आल्या आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावातील विजय लामकाने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला आहे. तर आरती जाधव ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे गावची सुकन्या आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याची प्रत्येक तरूणाची किंवा तरूणीची इच्छा असते. काही जणांना अनेक वेळ प्रयत्न करूनही यश मिळत नाही, त्यामुळे ते निराश होतात. मात्र काही जण जिद्द सोडत नाही. जोपर्यंत आपले ध्येय गाठत नाही, तोपर्यंत त्या ध्येयाच्या पाठी ते पळतच असतात. असंच काहीसं केलंय या सोलापूरच्या तरूण-तरूणींनं.

Web Title : MPSC परिणाम में सोलापुर चमका: लामकाने शीर्ष पर, जाधव महिलाओं में आगे।

Web Summary : सोलापुर के विजय लामकाने और आरती जाधव ने MPSC परीक्षा में उत्कृष्ट प्रदर्शन किया। लामकाने ने सभी उम्मीदवारों में पहला स्थान हासिल किया, जबकि जाधव महिला उम्मीदवारों में शीर्ष पर रहीं, जिससे उनके जिले को गर्व हुआ। उनकी सफलता उम्मीदवारों को प्रेरित करती है।

Web Title : Solapur shines in MPSC results: Lamkane tops, Jadhav leads women.

Web Summary : Vijay Lamkane and Aarti Jadhav from Solapur excelled in the MPSC exam. Lamkane secured first rank among all candidates, while Jadhav topped among women candidates, bringing pride to their district. Their success inspires aspiring candidates.