शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

MPSC : ना. तहसीलदारपदी निवड झालेल्या तरुणावर आली शेतमजूर म्हणून राबण्याची वेळ; म्हणाला, लोक आम्हाला हसतात आणि सरकारला...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 12:42 PM

MPSC : एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण अद्याप नियुक्ती न मिळालेल्या एका तरुणाने (Pravin Kotkar) केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. 

 मुंबई - एमपीएससीच्या (MPSC Exam) परीक्षांवरून सध्या राज्यात मोठा वाद निर्माण झालेला आहे. काल परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात परीक्षार्थींचा उद्रेक झाल्यानंतर आज परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. (MPSC Exam Date) या गदारोळादरम्यान, एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पण अद्याप नियुक्ती न मिळालेल्या एका तरुणाने केलेले ट्विट सध्या चर्चेत आले आहे. (Despite being elected as Tehsildar, he is not getting appointment, so young man work as an agricultural laborer) प्रवीण कोटकर असे या तरुणाचे नाव असून, त्याने एमपीएससीमधून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची ना. तहसीलदार म्हणून निवड झाली. मात्र निवड होऊन दहा महिने झाले तरी त्याला अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या तरुणावर सध्या मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. ट्विटरवरून व्यथा मांडताना प्रवीण कोटकर म्हणाला की, MPSC मधून माझी ना. तहसीलदार म्हणून निवड झाली. मात्र १० महिने झाले तरी सरकारने नियुक्ती दिलेी नाही. त्यामुळे सध्या मी शेतमजूर म्हणून काम करतोय. लोकं आम्हाला हसतात आणि सरकरला शिव्या देतात. नियुक्ती कधी मिळणार? असा सवाल त्याने विचारला आहे. 

दरम्यान, 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा गुरुवारी रद्द केल्याची घोषणा केल्यावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या म्हणजे शुक्रवारी नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे आश्वासन दिले होते. यानुसार आज एमपीएससीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता २१ मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtraमहाराष्ट्रEmployeeकर्मचारीjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी