शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

एकाच विमानातून प्रवास; पार्थ पवारांसोबतचा फोटो शेअर करत खासदार खासदार सुजय विखे म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 11:51 IST

जवळपास 40-50 मिनिटे दोघांनी शेजारी बसून एकत्र विमानप्रवास केला.

औरंगाबाद: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकमेकांवर नेहमी टीका करत असतात. यातच केंद्रीय संस्थांच्या कारवाईवरुन राज्यातील राजकारण तापलेलं असताना आता भाजपचे खासदार सुजय विखे पाटील(Sujay Vikhe Patil) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार(Parth Pawar) यांनी एकत्र विमान प्रवास केल्याचे काही फोटोज समोर आले आहेत.

अहमदनगरचे भाजप खासदार सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांनी औरंगाबाद ते मुंबई एकाच विमानातून प्रवास केला. दोघांनीही जवळपास 40 मिनिटे एकत्र घालवले. या प्रवासाचे फोटो खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर पोस्ट केले आहेत. हे फोटोज शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'मैत्री सर्व सीमांच्या पलिकडची.'(Friendship Beyond Boundaries..!).

दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये नेहमी आरोप प्रत्यारोप सुरू असतात. पण, दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांची चांगली मैत्री आहे. राजकीय नेत्यांच्या मैत्रीची महाराष्ट्रात अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार यांच्या रुपाने मैत्रीचे नवीन नाते राज्याला पाहायला मिळाले आहे. सुजय विखे पाटील यांनी पार्थ पवारांसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केल्यानंतर त्यावर लाईक्सचा वर्षाव होत आहे. दरम्यान, प्रवासादरम्यान सुजय विखे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये छान गप्पांची मैफल रंगली होती. यात राजकीय घडामोडींसह इतर विषयांवर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.  

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेparth pawarपार्थ पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस