“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 21:14 IST2025-10-01T21:14:00+5:302025-10-01T21:14:00+5:30
MP Shahu Maharaj On Maratha Reservation: ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते कोल्हापूर गॅझेट, कायद्याची पुस्तके, पेन आणि अन्य गोष्टींचे पूजन करण्यात आले.

“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
MP Shahu Maharaj On Maratha Reservation: कोल्हापुरात सकल मराठा समाजाकडून पुन्हा एकदा लढा सुरू करण्यात आला आहे. ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शस्त्र म्हणून कोल्हापूर गॅझेट, कायद्याची पुस्तके, पेन आणि अन्य गोष्टींचे पूजन करून आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तानाजी नलवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शाहू छत्रपती महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारसोबत बैठका घेतल्या. मात्र, सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही, अशी खंत खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली. शिवाय मराठा आरक्षणाचा लढा आपण वेगळ्या वळणावर नेत असून, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. यात शंका नाही, असे शाहू महाराजांनी म्हटले आहे.
दिल्लीतील निवास स्थानाबद्दल खंत नवे वस्तुस्थिती सांगितली आहे. खासदार होऊन दीड वर्ष झाले मात्र अजूनही कायमस्वरूपी घर मिळाले नाही, असे ते म्हणाले. यावेळी बोलताना शाहू महाराजांनी भारतरत्न पुरस्काराबद्दल मोठे भाष्य केले. भारतरत्न पुरस्कार देताना शासनाला नियम ठरवावे लागतील. स्वातंत्र्यानंतर जे हयात आहेत किंवा ज्यांचा मृत्यू झाला, त्यांना भारतरत्न देण्यासंदर्भात नियम करायला हवा, असे शाहू महाराजांनी म्हटले आहे.
दरम्यान, शाहू महाराज यांनी सांगितले की, धनगर आरक्षणाची कॅटेगरी बदलावी अशी मागणी आहे. मात्र, धनगर आरक्षणातही तोडगा निघाला असे मी समजत नाही.