शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

पडदा उघडणार!; राज्यात चित्रपट आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 06:01 IST

नामवंतांशी चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय. आसनक्षमतेची अट मात्र कायम राहणार?

ठळक मुद्देनामवंतांशी चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय.आसनक्षमतेची अट मात्र कायम राहणार?

मुंबई : राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू  होणार आहेत. चित्रपट व नाट्यसृष्टीतील संस्था व नामवंतांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी रसिकांना सुखावणारा निर्णय घेतला.

ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून तर धार्मिक स्थळे ७ ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारीच घेतला होता. धार्मिक स्थळे उघडल्यानंतर १५ दिवसांनी चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे उघडली जातील. ५ नोव्हेंबर या मराठी रंगभूमी दिनापासून तरी नाटकांचा पडदा उघडावा, अशी अपेक्षा नाट्यसृष्टीने व्यक्त केली होती. त्याआधीच दोन्ही क्षेत्रे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मात्र, दोन्ही ठिकाणी कोरोना नियम पाळावे लागतील. या बैठकीला टास्क फोर्सचे सदस्य, खा. संजय राऊत, निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर आदी उपस्थित होते.

आसनक्षमतेची अट कायम?चित्रपट व नाट्यगृहांना आसनक्षमतेची अट कायम राहण्याची शक्यता आहे. आधी मार्गदर्शक सूचना येतील आणि त्यानुसार व्यवस्था करण्यास काही दिवस लागतील, अशी स्थिती आहे. मार्च २०२० मध्ये चित्रपट व नाट्यगृहे बंद करण्यात आली होती. नोव्हेंबर २०२० मध्ये मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटींवर ती पुन्हा सुरू करण्यात आली. ४ नोव्हेंबर रोजी हा निर्णय शासनाने घेतला; पण प्रत्यक्षात दोन्ही सुरू होण्यास किमान एक महिना लागला होता. 

चित्रपट व नाट्य क्षेत्राची बहुप्रतीक्षित मागणी राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली आहे. त्यामुळे ही क्षेत्रे आर्थिक अडचणीतून बाहेर येतील. मल्टिप्लेक्स, सिनेमागृहे, नाट्यगृहे, खुले रंगमंच याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आठवडाभरात जारी करण्यात येतील.अमित देशमुख, सांस्कृतिक कार्यमंत्री.

चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद असल्याने इंडस्ट्रीमधील सगळ्यांची गणितं बिघडली होती. कलावंतांसह संबंधित सर्वांची अवस्था वाईट होती. त्यामुळे या निर्णयाचा अतिशय आनंद झाला.अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते.

 

टॅग्स :TheatreनाटकChief Ministerमुख्यमंत्रीUddhav Thackerayउद्धव ठाकरेAshok Sarafअशोक सराफRohit Shettyरोहित शेट्टीSubodh Bhaveसुबोध भावे Sanjay Rautसंजय राऊत