शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शिमग्याऐवजी शांततेत आंदोलन करा, चंद्रकांत पाटील यांचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 13:37 IST

मागासवर्ग आयोगाकडून अहवाल आल्यानंतर १५ ते ३० नोव्हेंबर या पंधरा दिवसांत सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

कोल्हापूर : मागासवर्ग आयोगाकडून अहवाल आल्यानंतर १५ ते ३० नोव्हेंबर या पंधरा दिवसांत सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील मराठा आंदोलकांना विनंती आहे, की सरकारवर विश्वास ठेवून शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, कोणाच्या नावाने शिमगा करू नका, असा टोला महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे लगावला.चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही मराठा आंदोलनाबद्दल असेच वादग्रस्त विधान केल्याने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. ९ ऑगस्टला झालेल्या आंदोलनावेळी पाटील यांच्यावर अत्यंत बोचरी टीका झाली होती, त्यामुळे मंत्री पाटील यांनी असे प्रत्युतर दिले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर महाराणी ताराबाई सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित युवा माहिती दूत उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. गेल्या चाळीस वर्षांतील सरकारे आरक्षणही देऊ शकले नाही, तसेच ज्या सुविधा द्यायला पाहिजेत त्या सुविधाही देऊ शकले नाहीत. परंतु या शासनाने आरक्षण देण्यास आम्ही बांधिल असल्याचा निर्णय केला.  त्याची प्रक्रिया करण्याबरोबरच आरक्षण मिळाल्यानंतर ज्या सवलती मिळतात, त्या आधीच देता येतील का? म्हणून सरकारने तीन योजना घोषित केल्या. त्यामध्ये कोणत्याही अभ्यासक्रमासाठी निम्मी फी सरकार भरत आहे.  गेल्या वर्षी या उपक्रमात २ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांची ६५४ कोटी इतकी फी सरकारने भरली आहे. दुसरी योजना दहा लाखांपर्यंतचे कर्ज व्याज सरकार भरत आहे. पुढील पाच वर्षात प्रत्येकी ३ लाख २५ हजार सरकार भरणार आहे. या कर्जाला सरकारने हमी दिल्याने बॅँकांनी मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायला सुरुवात केली.  यातून मराठा तरुणांनी व्यवसाय करावे आणि इतरांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. तिसरी योजना म्हणजे  प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजातील शंभर मुले आणि शंभर मुलींचे वसतिगृह सुरू करण्याची आहे. याची सुरुवात कोल्हापुरातून झाली आहे. ९२ विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वसतिगृहात १९ विद्यार्थी येऊन पोहोचले आहेत. १५ आॅगस्टनंतर कॉलेजमधील मुलांची संख्या वाढणार असल्याने या वसतिगृहातील मुलांचीही संख्या वाढेल. ------------------------------महिन्याभरात मुलींचे वसतिगृह कोल्हापुरातील मुलांचे वसतिगृह स्थिर झाले की मुलींसाठीही वसतिगृह सुरू केले जाणार आहे. त्यासाठी सुरक्षित जागेचा शोध सुरू असून महिन्याभरात हे वसतिगृह सुरू केले जाईल. कालच पुण्यातील वसतिगृह सुरू झाले असून, उर्वरित ठिकाणी इमारतींची कामे सुरू आहेत. येणाऱ्या काळात दहा जिल्ह्यात मराठा समाजातील मुले व मुलींसाठी वसतिगृहे सुरू केली जातील, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.-----------------------------------------पीएचडी करणा-या मुलांना फेलोशिपबार्टीच्या धर्तीवर सारथी संस्थेची स्थापना केली असून, मराठा समाजातील पीएचडी करणा-या मुलांना फेलोशिप व एमपीएससी व यूपीएससी करणा-या मुलांच्या फीमधील काही भाग ही संस्था उचलणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.---------------------------------------------मराठा आंदोलकांनी पालकमंत्र्यांची भेट टाळलीमुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यासाठी सकल मराठा समाजाचे दिलीप देसाई, सचिन तोडकर, स्वप्निल पार्टे, हर्षल सुर्वे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. ध्वजारोहण सोहळा झाल्यानंतर पालकमंत्री पाटील हे स्वातंत्र्य सैनिकांसह उपस्थित मान्यवरांच्या भेटी घेत निघाले होते. पालकमंत्री आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून आंदोलक त्यांची भेट टाळून तेथून बाहेर पडले. मराठा आंदोलक येणा-या असल्याने परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलmarathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण