शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 12:43 IST

थकीत एफआरपीप्रकरणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे आदेश

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

सोलापूर: जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांकडे एफआरपीचे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये थकल्याने आरआरसीनुसार जंगम मालमत्ता व साखर जप्तीचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी दिले आहेत. दरम्यान, ३० एप्रिलअखेर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांकडे ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे थकले असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

राज्याचा साखर हंगाम संपला असून सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण साखर कारखाने फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान बंद झाले आहेत. थकबाकीदार साखर कारखान्यांची सुनावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतली. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांची आरआरसीनुसार साखर जप्ती करून शेतकºयांचे पैसे देण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी काढले. यामध्ये संत कूर्मदास साखर कारखान्याकडे १२ कोटी २२ लाख ६९ हजार, बबनराव शिंदे शुगर तुर्कपिंपरीकडे १९ कोटी ६० लाख ४३ हजार, विठ्ठल रिफायनरीज पांडे (करमाळा) या कारखान्याकडे २६ कोटी ७१ लाख ३१ हजार तर जयहिंद शुगरकडे १६ कोटी २४ लाख ४० हजार रुपये, याप्रमाणे ७४ कोटी ७८ लाख ८३ हजार रुपये शेतकºयांची देणेबाकी आहे. 

जानेवारीमध्ये साखर आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणीनंतर ३१ जानेवारीला काढलेल्या आरआरसीच्या कारवाईमध्ये जिल्ह्यातील ९ साखर कारखान्यांचा समावेश होता. ही कारवाई तहसील कार्यालयाकडून थांबली असतानाच  साखर कारखान्यांनी शेतकºयांचे काही पैसे दिले आहेत. जे कारखाने सुनावणीच्या दिवशी थकबाकीत आहेत अशाच कारखान्यांवर पुन्हा आरआरसीनुसार कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून  सांगण्यात आले.

 फेब्रुवारी-मार्च महिन्यात गाळप बंद झाल्यानंतर आतापर्यंत शेतकºयांना उसाचे पैसे देणे बंधनकारक होते; मात्र ३० एप्रिलच्या माहितीनुसार जिल्ह्यातील गोकुळ माऊली या एकमेव साखर कारखान्याने एफआरपीनुसार  संपूर्ण रक्कम शेतकºयांना दिली आहे. अन्य ३० साखर कारखान्यांनी अद्यापही ९७६ कोटी ९९ लाख रुपये शेतकºयांचे दिले नसल्याचे सोलापूर साखर सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

‘विठ्ठलराव शिंदे’कडे सर्वाधिक थकबाकी- ३० एप्रिलअखेर विठ्ठलराव शिंदे कारखान्याकडे ७४ कोटी ४० लाख,विठ्ठल गुरसाळे कारखान्याकडे ७२ कोटी १८ लाख, लोकनेते अनगरकडे ५८ कोटी ५७ लाख,गोकुळकडे ५३ कोटी १५ लाख, विठ्ठल रिफायनरीज पांडेकडे ५३ कोटी ८३ लाख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील कारखान्याकडे ५४ कोटी ७ लाख, सिद्धेश्वर कारखान्याकडे ४९ कोटी २३ लाख,  लोकमंगल शुगरकडे ४६ कोटी ६८ लाख, बबनराव शिंदे तुर्कपिंपरीकडे ४४ कोटी १५ लाख,  पांडुरंगकडे ४२ कोटी २१ लाख, जकरायाकडे ३८ कोटी ७० लाख, जयहिंदकडे ३७ कोटी २३ लाख, सिद्धनाथ शुगर ३४ कोटी ६९ लाख.

जंगम व स्थावर मालमत्तेची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्याच्या सूचना आमच्या विशेष लेखापरीक्षकांना दिल्या आहेत. ही माहिती दिल्यानंतर आरआरसीनुसार कारवाई करण्याचे महसूल खात्याला सोयीचे होणार आहे.-अविनाश देशमुख,साखर सहसंचालक, सोलापूर 

च्मातोश्री लक्ष्मी शुगरकडे ३२ कोटी ५२ लाख, भैरवनाथ आलेगावकडे ३० कोटी ६९ लाख, युटोपियनकडे २७ कोटी ८० लाख, सासवड माळीशुगरकडे २७ कोटी २१ लाख, भीमा टाकळी सिकंदरकडे २६ कोटी ८९ लाख, श्री मकाईकडे २२ कोटी १० लाख, लोकमंगल अ‍ॅग्रो बीबीदारफळकडे १७ कोटी ९५ लाख,  भैरवनाथ विहाळकडे १६ कोटी ५३ लाख, फॅबटेककडे १५ कोटी ५५ लाख, आदिनाथकडे १४ कोटी ७१ लाख, भैरवनाथ लवंगीकडे १४ कोटी ४४ लाख,सहकार शिरोमणी वसंतराव काळे १३ कोटी ५३ लाख, कूर्मदासकडे १२ कोटी २३ लाख,  संत दामाजी कारखान्याकडे १० कोटी ८० लाख, सीताराम महाराजकडे १० कोटी ५७ लाख, इंद्रेश्वरकडे ७ कोटी २५ लाख रुपये याप्रमाणे थकबाकी असल्याचे साखर सहसंचालक कार्यालयाने सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती