शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

CoronaVirus: दुसऱ्या लाटेत ६० हजारांहून अधिक कोरोनाबळी! राज्यातील भयावह आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 9:53 AM

CoronaVirus deaths in Maharashtra: आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख १४ हजार १५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. यातील जवळपास अर्धे मृत्यू हे १५ फेब्रुवारीनंतरचे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चार महिन्यांत ६० हजारांहून अधिक कोरोनाबळींची नोंद झाली आहे. पहिल्या लाटेत २ लाख ४८ हजार ८०२ रुग्णांची नोंद झाली हाेती, तर ५१ हजार ३६० मृत्यू झाले.

आतापर्यंत महाराष्ट्रात १ लाख १४ हजार १५४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. यातील जवळपास अर्धे मृत्यू हे १५ फेब्रुवारीनंतरचे आहेत. काेरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे मृत्यू झाले आहेत. देशभरात होणाऱ्या काेरोना मृत्यूंपैकी २० टक्क्यांहून अधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. एकंदरीत भारतामध्ये आजपर्यंत झालेल्या ३.४ लाख काेरोना मृत्यूंपैकी ३० टक्के राज्यातील आहेत. गेल्या वर्षभरापासून हे प्रमाण स्थिर असल्याचे दिसत आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. मुंबईत मृतांचा आकडा १५,२१६ च्या जवळपास आहे, तर पुण्यात ते १५,५९३ पेक्षा जास्त आहे.

राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, यावेळेच्या लाटेत मृत्यूंचे प्रमाण अधिक असण्यामागे विविध कारणे आहेत. त्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण आढळून आल्याची नोंद आहे. तसेच, ग्रामीण भागातही संसर्गाची तीव्रता अधिक होती, त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था अपुरी असल्याने मृत्यू ओढावल्याचे दिसून आले. ऑक्सिजनचा तुटवडा, खाटांची उपलब्धता नसणे, उशिरा निदान या सर्व कारणांमुळे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.दुसऱ्या लाटेत रुग्णालयांची गरज अधिक पहिल्या लाटेत अनेक रुग्ण घरी क्वारंटाइन होऊन बरे झालेले दिसून आले. मात्र, दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासली. विषाणूत बदल झाल्याने रुग्णांना अधिक धोका झाल्याचे दिसून आले. त्यामुळे पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक चिंताजनक ठरली, अशी माहिती डॉ. केदार घोसाळकर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस