शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठीचा पैसा कुठून आला? तपास होणार!
2
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
3
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
4
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
5
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
6
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
7
ऑस्ट्रेलियन भूमीवर वनडेत सर्वाधिक षटकार कोणी मारले? पहिलं नाव पाहून खूश व्हाल!
8
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
9
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
10
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
11
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
12
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
13
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
14
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
15
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
16
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
20
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

मॉन्सून उद्या येणार महाराष्ट्राच्या सीमेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 20:40 IST

‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनच्या प्रगतीचा मार्ग रोखला होता़. आता त्याचा परिणाम नाहीसा झाल्याने मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देपुणे, मुंबईत २३ जूनपर्यंत मॉन्सून धडकण्याची शक्यता

पुणे : गेले काही दिवस ज्याची प्रतिक्षा सर्व जण करत होते. तो मॉन्सूनचे येत्या २ दिवसात शुक्रवारपर्यंत दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटकाच्या काही भागामध्ये, आंध्र प्रदेश, तामिळनाडुचा उर्वरित भागात आगमन होण्याची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़. अनुपम कश्यपी यांनी सांगितले़. बुधवारी अरबी समुद्रातील मॉन्सूनच्या शाखेने पुढे वाटचाल केली नसली तरी मॉन्सूनच्या ईशान्य शाखेची वाटचाल सुरु झाली असून त्याने गोलपारा, अलिपूरद्वार, गंगटोक येथे आगमन केले असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे़. गुरुवारी, शुक्रवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ‘वायू’ चक्रीवादळाने मॉन्सूनच्या प्रगतीचा मार्ग रोखला होता़. आता त्याचा परिणाम नाहीसा झाल्याने मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले असून येत्या २ ते ३ दिवसात मॉन्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा, आंध्र प्रदेश, तामिळनाडुचा उर्वरित भाग, बंगालचा उपसागरातील आणखी काही भाग, ईशान्य भारतातील काही भाग, पश्चिम बंगाल, बिहार, सिक्कीम, झारखंड, ओडिशा या भागात मॉन्सूनचे आगमन होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरण आहे़. याबाबत पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ़ अनुपम कश्यपी यांनी सांगितले की, येत्या एक दोन दिवसात म्हणजेच २१ जूनपर्यंत दक्षिण कोकण, गोवामध्ये मॉन्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे़. त्यानंतर पुणे व मुुंबईमध्ये २२ जूनपासून पावसाला सुरुवात होऊ शकते़. त्यानंतर २३ जूनपर्यंत तो पुणे, मुंबईत स्थिरावेल़. त्यानंतर पुढील दोन दिवसात तो महाराष्ट्राच्या विस्तृत प्रदेशात पोहचले़ २५ जूनपर्यंत मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापण्याची शक्यता आहे़. गेल्या २४ तासात गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़. राजापूर ६०, अलिबाग ३९, महाबळेश्वर २३, मुंबई १८, रत्नागिरी १२, पणजी १६ मिमी पावसाची नोंद झाली होती़. बुधवारी दिवसभरात महाबळेश्वर येथे २०, कोल्हापूर ५, रत्नागिरी १६, पणजी, डहाणु ३ मिमी पावसाची नोंद झाली़.

इशारा : २० जून रोजी विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़. २० व २१ जून रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता़ २२ व २३ जून रोजी कोकण, गोवा व दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे़. 

 

टॅग्स :PuneपुणेMonsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती