शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

महाराष्ट्रात मान्सूनचे ७ जून रोजी आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 4:23 AM

एक दिवस उशिरा आगमन; नागपूरमध्ये २ दिवस उशीर होणार

पुणे : गेल्या दशकातील मान्सूनच्या आगमानाच्या अभ्यासावरुन मान्सूनच्या आगमन व परतीच्या तारखा भारतीय हवामान विभागाने निश्चित केल्या होत्या़ मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये त्यात मोठा बदल झाल्याचे दिसून आले आहे़ त्यामुळे शेतकरी तसेच व्यावसायिकांचे नियोजनामध्ये गोंधळ होऊ लागला़ त्यामुळे हवामान विभागाने १९६१ ते २०१९ मधील मान्सूनच्या आगमन व परतीचा अभ्यास करुन नवीन तारखा जाहीर केल्या आहेत़ या नव्या तारखांनुसार मॉन्सूनचा अंदाज वर्तविला जाणार आहे.केरळमध्ये १ जूनला मान्सूनच्या आगमनाची तारीख निश्चित करण्यात आली आहे़ नव्या तारखांनुसार काही ठिकाणी एक दिवस ते काही ठिकाणी ३ ते ४ दिवसांने मान्सूनचे आगमन लांबणार आहे़ महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन गोवा व दक्षिण कोकणात ७ जून रोजी होणार आहे़ मात्र, कोल्हापूरपासून मुंबईपर्यंत मान्सूनचे आगमन एक दिवस उशीरा होणार आहे़ नागपूरमध्ये २ दिवस तर जळगावमध्ये ५ दिवस उशीराने आगमन होणार आहे़ महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशाच्या काही भागात जुन्या तारखांनुसार आता ३ ते ७ दिवस उशीरा मान्सूनचे आगमन होणार आहे.त्याचवेळी मान्सूनच्या परतीचा प्रवास ७ ते १५ दिवस उशीरा सुरू होणार आहे़ मात्र, दक्षिण भारतातून मान्सून १५ ऑक्टोबरलाच परतेल.आगमनाचे नवे निकषयापूर्वी मान्सूनच्या आगमनाच्या तारखा १९०१ ते १९४० दरम्यानच्या मान्सूनच्या आगमनानुसार निश्चित करण्यात आल्या होत्या़ आता नव्या तारखा १९६१ ते २०१९ दरम्यानच्या अभ्यासावरुन निश्चित करण्यात आल्या आहेत़ तसेच मान्सूनच्या परतीच्या तारखा पूर्वी १९०१ ते १९४० दरम्यानच्या अभ्यासावरुन निश्चित केल्या होत्या़ आता १९७१ ते २०१९ दरम्यानच्या मान्सूनच्या परतीच्या अभ्यासावरुन नव्या तारखा निश्चित केल्या आहेत़                                           मान्सूनच्या नव्या तारखाठिकाण                     मान्सून आगमन                      परतीचा प्रवास                         नव्या तारखा जुन्या तारखा      नव्या तारखा   जुन्या तारखादक्षिण कोकण         ७ जून        ७ जून           १४ ऑक्टोबर   १० ऑक्टोबरकोल्हापूर                ९ जून         ९ जून           ११ ऑक्टोबर    १ ऑक्टोबर(महाराष्ट्र)सातारा                  १० जून         ९ जून            ९ ऑक्टोबर     ३० सप्टेंबरपुणे                       १० जून         ९ जून            ११ ऑक्टोबर    ६ ऑक्टोबरमुंबई                     ११ जून        १० जून            ८ ऑक्टोबर    २९ सप्टेंबरअहमदनगर          १२ जून        १० जून            ८ ऑक्टोबर     २९ सप्टेंबरसुरत (गुजरात)     १९ जून         १३ जून           २ ऑक्टोबर     २५ सप्टेंबरजळगाव               १८ जून         १३ जून           ६ ऑक्टोबर     २७ सप्टेंबरनागपूर                 १५ जून         १३ जून           ६ ऑक्टोबर     ६ ऑक्टोबर

टॅग्स :Rainपाऊस