शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

Monsoon Update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 10:02 IST

Withdrawal of Monsoon in India: यंदा मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात हाहाकार उडवला. मागील महिना दीड महिन्यांपासून बरसणाऱ्या मान्सूनने आता परतीची वाट धरली आहे. पण, तो भारतातून कधीपर्यंत परत जाणार आहे?

Monsoon Retreat in India: महाराष्ट्र आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनचा अनेक ठिकाणी फटका बसला असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये धो धो बरसलेला मान्सून कधीपर्यंत भारतात मुक्कामी असणार आहे? यावर्षीची दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार आहे? याचं अखेर हवामान विभागाने उत्तर दिलं आहे. हवामान विभागाने देशाच्या कोणत्या भागातून मान्सून कधी परत जाणार याचा अंदाज मांडला आहे. 

ठरलेल्या वेळेआधीच भारतात दाखल झालेल्या मान्सूनने निर्धारित तारखेआधीच परतीचा रस्ता धरला आहे. १४-१५ सप्टेंबरपासून मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला असून, हळूहळू तो पुढे सरकत आहे. २१ सप्टेंबरपर्यंत मान्सूनने गुजरात मध्य प्रदेश गाठले आहे. 

मान्सून भारतातून कधीपर्यंत परत जाणार?

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सून १५ ऑक्टोबरपर्यंत भारतातून जाईल. त्यामुळे यंदा दिवाळीपर्यंत मान्सूनचा मुक्काम नसणार आहे. महाराष्ट्रातून मान्सून १० ऑक्टोबर पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.  १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून कर्नाटकपर्यंत पोहोचेल. 

२३-२७ सप्टेंबर या कालावधीत मान्सून ओडिशामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान झारखंड आणि आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

जातानाही मान्सून झोडपणार

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार परतीच्या मार्गावर असलेला मान्सून अनेक भागांना झोपडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 

राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसMonsoon forecastमोसमी पावसाचा अंदाजRainपाऊसweatherहवामान अंदाजDiwaliदिवाळी 2024Maharashtraमहाराष्ट्र