Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 15:22 IST2025-05-13T15:22:25+5:302025-05-13T15:22:49+5:30
Monsoon Update : हवामान विभागाने मान्सून बाबत मोठी अपडेट दिली आहे.

Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
Monsoon Update ( Marathi News ) : देशभरातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात. मान्सूनच्या अंदाजावर शेतकरी शेतीची तयारी करत असतात. दरम्यान, या वर्षी जास्त पाऊस होणार असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले होते. हवामान झपाट्याने बदलत आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनबाबतची नवीनतम अपडेट दिली आहे.
नैऋत्य मान्सून मंगळवारी म्हणजेच आज दक्षिण बंगालच्या उपसागरात, दक्षिण अंदमान समुद्रात, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राच्या काही भागात पोहोचला आहे.
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन दिवसांत निकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण बंगाल उपसागराचा बहुतेक भाग, अंदमान आणि निकोबार बेटे, उर्वरित अंदमान समुद्र आणि मध्य बंगाल उपसागराच्या काही भागात मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी सुरु होणार?
महाराष्ट्रातही वेळेआधीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २७ मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि महाराष्ट्रात मान्सून ६ जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात वाऱ्यांचा प्रभाव वाढेल
दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. समुद्रसपाटीपासून १/५ किलोमीटर अंतरावर वाऱ्याचा वेग २० नॉट्सपेक्षा जास्त झाला आहे आणि काही भागात तो ४.५ नॉट्सपर्यंत वाढला आहे.
हवामान विभागाने काय सांगितले?
प्रदेशात आउटगोइंग लॉंगवेव्ह रेडिएशन देखील कमी झाले आहे, हे ढगाळ हवामानाचे संकेत आहेत. OLR हे पृथ्वीवरून अवकाशात पसरणाऱ्या ऊर्जेचे मोजमाप आहे, हे जास्त तरंगलांबींवर ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरून आणि वातावरणातून उत्सर्जित होते. या परिस्थितीमुळे या प्रदेशात मान्सूनचे आगमन झाल्याचे संकेत मिळत आहेत, असं हवामान विभागाने म्हटले आहे.
About Advance of Southwest 2025 on 13th May 2025:
— India Meteorological Department (@Indiametdept) May 13, 2025
1) Widespread moderate rainfall with heavy rainfall at a few places occurred over the Nicobar Islands during past 24 hours. Thus, the widespread rainfall with isolated/scattered heavy rainfall continued over the Nicobar Islands… pic.twitter.com/JyabwSPGIc