शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

यंदा कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यावर मॉन्सूनने दाखविली अधिक 'कृपादृष्टी' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 19:37 IST

राज्यात यंदा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला..

ठळक मुद्देविदर्भात मॉन्सूनची १० टक्के तुट : ४ जिल्ह्यात दुष्काळाची स्थितीदक्षिण भारतात सर्वाधिक २९ टक्के अधिक पाऊस

पुणे : यंदा मॉन्सूनने विदर्भ वगळता महाराष्ट्रावर अधिक कृपादृष्टी दाखविली असून मॉन्सूनच्या चार महिन्यात राज्यात तब्बल १६ टक्के अधिक वर्षा झाली आहे.त्याचवेळी विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी केवळ बुलढाणा, नागपूर आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. तसेच देशभरात यंदा सरासरीच्या तुलनेत ९ टक्के आणि पाऊस झाला आहे.          राज्यात यंदा जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला. जुलैमध्ये पावसाने थोडी ओढ दिली होती. नेहमी दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या मराठवाड्यात यंदा मे महिन्यापासूूनच पावसाने साथ दिली आहे. बंगालच्या उपसागरात यंदा कमी दाबाचे क्षेत्र कमी वेळा तयार झाल्याने त्याचा फटका विदर्भासह पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणाला बसला आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सुरुवातीपासून पाऊसमान कमी होते. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस झाला आहे. हे बहुदा प्रथमच घडत आहे. 

राज्यात सर्वाधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : अहमदनगर ७६, मुंबई उपनगर ६७, औरंगाबाद ६४, 

अधिक पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : मुंबई शहर ५८, सिंधुदुर्ग ५३, रत्नागिरी २४, धुळे ४७, पुणे ४०, जळगाव २४, कोल्हापूर २३, जालना ३९, सांगली २६, सोलापूर २५, बीड ४६, लातूर २९, उस्मानाबाद २३, सोलापूर २५सर्वसाधारण पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : पालघर १३, रायगड १५, ठाणे १८,ख नंदुरबार १०, नाशिक १९, सातारा ६, हिंगोली ८, नांदेड ८, परभणी १९, बुलढाणा ५, नागपूर ७, वाशिम १६

सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे (टक्केवारी) : अकोला -२७, अमरावती -२०, भंडारा -४, चंद्रपूर -१८, गडचिरोली, गोंदिया, वर्धा प्रत्येकी -८, यवतमाळ -२४़़़़़़राज्यातील विभागवार चार महिन्यात पडलेला पाऊस (मिमी)विभाग                 प्रत्यक्ष पडलेला पाऊस       सरासरी पाऊस    फरककोकण                          ३६६२                           २८७५                २७मध्य महाराष्ट्र               ९६६                             ७५१                  २९मराठवाडा                      ८६६                              ६६८                ३०विदर्भ                            ८५१                               ९४३               -१०़़़़़़़देशभरात ९ टक्के अधिक वर्षादेशभरात यंदा सरासरीच्या तुलनेत ९ टक्के आणि पाऊस झाला आहे.  देशभरातील ३६ हवामान विभागापैकी ५ विभागात सरासरीपेक्षा २० टक्क्यांहून अधिक कमी पाऊस झाला आहे. त्यात धान्याचे कोठार म्हटल्या जाणाऱ्या पंजाब, हरियाणा,चंदीगडमध्ये -१४ टक्के, पश्चिम उत्तर प्रदेश -३७, उत्तराखंड -२०, जम्मू काश्मीर -३४, हिमाचल प्रदेश -२६ टक्के कमी पाऊस झाला आहे.  दक्षिण भारतात सर्वाधिक २९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य भारतात १५ टक्के अधिक पाऊस झाला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाgoaगोवा