पुणे : महिला पोलीस कर्मचाऱ्याशी फोनवरून अश्लील संभाषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईलधारकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस शिपायाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला पोलीस या शिपाई या खडक पोलीस ठाण्यात नेमणुकीस आहेत. त्या गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी १ दरम्यान ठाणेअंमलदार कक्षात त्या होत्या. त्या वेळी एका व्यक्तीने पोलीस ठाण्याला फोन केला होता. तो फोन फिर्यादी यांना उचलला. त्या वेळी संबंधिताने त्यांच्याशी अश्लील भाषेत संभाषण करून त्यांचा विनयभंग केला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}