Mohit Kamboj Car Attack: मोहित कंबोजच्या गाडीत अ‍ॅसिड होते?; विनायक राऊतांच्या आरोपांवर कंबोज संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 23:27 IST2022-04-22T23:27:11+5:302022-04-22T23:27:53+5:30

Attack on Mohit Kamboj By Shivsena : मोहित कंबोज यांनी हल्ल्यानंतर एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी आपण गाडीतच होतो, असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या शिवसैनिकांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे. 

Mohit Kamboj Car Attack: acid in Mohit Kamboj's car?; Kamboj was angry over Shivsena's MP Vinayak Raut's allegations | Mohit Kamboj Car Attack: मोहित कंबोजच्या गाडीत अ‍ॅसिड होते?; विनायक राऊतांच्या आरोपांवर कंबोज संतापले

Mohit Kamboj Car Attack: मोहित कंबोजच्या गाडीत अ‍ॅसिड होते?; विनायक राऊतांच्या आरोपांवर कंबोज संतापले

भाजपा नेते मोहित कंबोज यांच्या कारवर आज मातोश्रीबाहेर हल्ला झाला. या गाडीमध्ये अ‍ॅसिड होते. ते शिवसैनिकांवर टाकण्याचा कट कंबोज यांचा होता. मातोश्रीबाहेरील शिवसैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचा आरोप खासदार विनायक राऊतांनी केला आहे. यावर मोहित कंबोज यांनी उत्तर दिले आहे. 

माझ्यावर हल्ला झाला. पोलिसांचे मी आभार मानतो, परंतू त्यांनी कारवाई करावी. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. मंत्री अस्लम शेख, प्रसाद लाड यांच्यासह आम्ही एका लग्नाला गेलो होतो. ते माझ्या मागे पुढेच होते. माझ्या गाडीत अ‍ॅसिड ठेवले हे विनायक राऊत सांगताहेत, ते त्यांनी ठेवले होते का? ते गाडीत बसले होते का? असा संतप्त सवाल कंबोज यांनी केला आहे. यावर कंबोज यांनी जावेद-सलीम जोडीमध्ये आणखी कोणाला घुसवू नका, असे ते म्हणाले. 

दरम्यान मोहित कंबोज यांनी हल्ल्यानंतर एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी आपण गाडीतच होतो, असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या शिवसैनिकांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे. 

नेमके काय घडले...
थोड्या वेळापूर्वी मातोश्री परिसरात भाजपा नेते मोहित कंबोज यांच्यावर हल्ला झाला आहे. कंबोज यांची गाडी शिवसैनिकांनी पाहिली आणि तिकडे धाव घेतली. यावेळी कंबोज यांचे सुरक्षारक्षक आणि तिथे असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत कंबोज यांची सुरक्षा केली. यावेळी कंबोज यांना पुढे पाठवून देण्यात आले. . कंबोज रेकी करण्यासाठी आलेले असा आरोप शिवसैनिकांनी केला आहे.  

Web Title: Mohit Kamboj Car Attack: acid in Mohit Kamboj's car?; Kamboj was angry over Shivsena's MP Vinayak Raut's allegations