शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची भागवत, राजनाथसिंहांशी भेट

By admin | Updated: May 11, 2014 00:34 IST

निवडणूक प्रचार संपल्यानंतर भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.

जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
उत्तर प्रदेशातील अंतिम टप्प्याचा निवडणूक प्रचार संपल्यानंतर भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सायंकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीत आठ टप्प्यांत झालेल्या निवडणुकीतील भाजपा आणि एनडीएतील घटक पक्षांच्या स्थितीबाबत मोदींनी भागवत यांना माहिती दिली. नवीन सरकार स्थापनेच्या शक्यता आणि समीकरणांबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. यावेळी संघाचे ज्येष्ठ नेते सुरेश सोनी उपस्थित होते. विशेष म्हणजे भाजपा आणि संघाच्या नेत्यांमध्ये झालेल्या या भेटीदरम्यान भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. गेल्या ४0 वर्षांपासून आडवाणी यांनी संघ आणि भाजपा यांच्यात दुवा साधण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. 
सूत्रांच्या माहितीनुसार प्रचार संपवून दिल्लीत पोहोचलेल्या मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. निवडणूक अभियान सुरू करण्यापूर्वी मोदींनी वाजपेयी यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यानंतर ते भाजपा अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी गेले. राजनाथ यांच्या समवेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात डॉ. मोहन भागवत यांच्या भेटीसाठी गेले. लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या नाराजीनंतरही मोदींना भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले होते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत घेण्याचा सल्ला भागवत यांनी मोदींना भेटीदरम्यान दिल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी नागपूरमध्ये सरसंघचालक भागवत यांची भेट घेऊन मोदींची कार्यशैली आणि पक्षात ज्येष्ठ नेत्यांची उपेक्षा याबाबत तक्रार केली होती. त्यापार्श्‍वभूमीवर भागवत यांनी मोदींना हा सल्ला दिल्याचे समजते.