शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

अजितदादांनी कधीही भाजपामध्ये प्रवेश घेतलेला नव्हता- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 8:52 PM

भाजपासोबत जाऊन पुन्हा राष्ट्रवादीत आलेल्या अजित पवारांची सध्या जोरदार चर्चा आहे.

मुंबईः भाजपासोबत जाऊन पुन्हा राष्ट्रवादीत आलेल्या अजित पवारांची सध्या जोरदार चर्चा आहे. त्यांना राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपद मिळणार का, याचीच उत्कंठा त्यांच्या कार्यकर्त्यांना लागून राहिली आहे. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपद न मिळाल्यास अजितदादा पुन्हा वेगळा विचार करू शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.  त्यासंदर्भात सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्या म्हणाल्या, अजितदादांनी कधीही भाजपामध्ये प्रवेश घेतलेला नव्हता. पक्ष आणि कुटुंब ही आमची अंतर्गत बाब आहे. ते पक्षाचे वरिष्ठ नेते आणि कायमच माझे मोठे भाऊ राहतील. तसेच काल शरद पवारांनी मोदींनी दिलेल्या ऑफरच्या केलेल्या खुलाशावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादीला त्यांनी तशी ऑफर दिली हे मोदींचं मोठेपण आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. त्यांनी सांगितलं, तसं काहीही झालं नसल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राष्ट्रवादी जर शिवसेनेसोबत जाऊ शकते, तर भाजपासोबत का नाही? असा प्रश्न सुप्रिया यांना विचारण्यात आला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना, सुप्रिया सुळेंनी शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचं विश्लेषणही केलं.महाराष्ट्रातील राजकारणात आमचे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले असतात. भलेही आमच्या विचारात काही प्रमाणात अंतर असेल, पण आमचे वैयक्तिक संबंध चांगले राहिले आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पवारसाहेब माझे केवळ वडिल नाहीत, तर माझे बॉसही आहेत. नोकरी टिकवायची असेल तर, बॉस इज ऑलवेज राईट... असे म्हणत शरद पवारांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे