Lokmat Sarpanch Awards 2018- सरपंचांना मोदींच्या भेटीला नेणार - रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 21:44 IST2018-03-28T21:44:03+5:302018-03-28T21:44:03+5:30
गावाच्या विकासासाठी कोणत्याही नव्या योजनांच्या घोषणेची गरज नाही. केंद्र व राज्य शासनाच्या आधीच प्रचंड योजना आहेत. या योजनांचा सखोल अभ्यास व सातत्याने पाठपुरावा केल्यास राज्यातील प्रत्येकच सरपंच आपल्या गावाला ‘स्मार्ट व्हीलेज’ बनवू शकतो, असे खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

Lokmat Sarpanch Awards 2018- सरपंचांना मोदींच्या भेटीला नेणार - रावसाहेब दानवे
मुंबई- गावाच्या विकासासाठी कोणत्याही नव्या योजनांच्या घोषणेची गरज नाही. केंद्र व राज्य शासनाच्या आधीच प्रचंड योजना आहेत. या योजनांचा सखोल अभ्यास व सातत्याने पाठपुरावा केल्यास राज्यातील प्रत्येकच सरपंच आपल्या गावाला ‘स्मार्ट व्हीलेज’ बनवू शकतो, असे खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
दानवे म्हणाले, ‘लोकमत’ने सरपंचाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा घेतलेला हा उपक्रम पहिला आहे. यातील राज्यस्तरावर निवड झालेल्या १३ सरपंचांना सपत्नीक विमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला दिल्लीत नेऊ व त्यांना भाजपा सरकारच्या कामाची झलक दाखवू, अशी घोषणा ही दानवे यांनी यावेळी केली.
यावेळी ना. पांडुरंग फुंडकर, ना. अर्जुन खोतकर, ना. जयकुमार रावल, आमदार तटकरे, पोपटराव पवार, राजीव पोद्दार यांनीही विचार मांडले. या कार्यक्रमात बीकेटी टायर्सची नवी अॅड फिल्म प्रदर्शित करण्यात आली. या कार्यक्रमात विविध गटातून राज्यस्तरावर निवड झालेल्या १३ सरपंचांचा मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतील भाऊ कदम व कुशल बद्रिके यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. ‘बापमाणूस’ या मालिकेतील कलाकारांशीही यावेळी संवाद साधण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याचे संचालन अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी केले.