शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

मनसेत मतभेद; राज ठाकरेंच्या भूमिकेवर पदाधिकाऱ्यांकडून प्रश्नांची सरबत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 10:35 PM

पक्षाच्या बैठकीत राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल पदाधिकाऱ्यांचे सवाल

मुंबई: गेल्याच आठवड्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षाच्या पहिल्या राज्यव्यापी मेळाव्यात हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोदणीच्या बाजूनं भूमिका घेतली. मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेवर त्यांच्याच पदाधिकाऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आपली नेमकी भूमिका काय? आपण सीएए-एनआरसीला पाठिंबा देऊन भाजपासोबत जाणार का? मग विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधात घेतलेल्या भूमिकेचं काय?, अशा प्रश्नांची सरबत्ती पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. राज ठाकरे अवघ्या १० मिनिटांत बैठकीतून निघून गेल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी हे प्रश्न उपस्थित केले. आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात बैठक झाली. शॅडो कॅबिनेट आणि ९ फेब्रुवारी सीएए-एनआरसी समर्थनार्थ काढण्यात येणारा मोर्चा याबद्दल बैठकीत चर्चा होणार होती. मात्र अध्यक्ष राज ठाकरे बैठकीला उशिरा पोहोचले. बैठक सुरू होताच ते केवळ १० मिनिटांत निघून गेले. राज ठाकरे सभागृहातून निघून गेल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांपुढे त्यांची मतं मांडली. आपली भाजपाबद्दलची यापुढची भूमिका काय असणार?, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपाला आपण कडाडून विरोध केला. त्याच भाजपासोबत आपण जाणार आहोत का?, सीएए, एनआरसीबाबत आपली नेमकी भूमिका काय?, मनसे या कायद्याच्या तसंच केंद्र सरकारनं यासंदर्भात घेतलेल्या निर्णयांच्या बाजूनं असणार का?, असा प्रश्नांचा भडिमार पदाधिकाऱ्यांनी केला.आपण यापूर्वी भाजपाला कडाडून विरोध केलेला असताना आता अचानक भाजपाच्या समर्थनार्थ जाणार असू तर आपण लोकांसमोर काय युक्तिवाद करणार आहोत, असाही मुद्दा काही पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. यामध्ये मुख्यत्वे कल्याण-डोंबिवली व मुंबईतील काही पदाधिकारी आक्रमक होते. मात्र याबद्दल मनसे नेते बाळा नांदगावकर यांना याबाबत स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे उद्या कृष्णकुंजवर बैठक होणार असून कदाचित राज ठाकरे हे स्वतः पदाधिकाऱ्यांच्या विधानांवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी