मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना न्यायालयाने ठोठावला ५०० रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:52 AM2023-01-19T11:52:45+5:302023-01-19T11:55:08+5:30

जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण...

MNS president Raj Thackeray was fined Rs 500 by the court | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना न्यायालयाने ठोठावला ५०० रुपयांचा दंड

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना न्यायालयाने ठोठावला ५०० रुपयांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

परळी:  मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना परळीन्यायालयाने २००८ मधील एका प्रकरणात अटक वॉरंट बजावले होते. याची सुनावणी २३ जानेवारीला आहे. त्यापूर्वी म्हणजे बुधवारी सकाळी ठाकरे न्यायालयात हजर झाले. यावेळी न्यायालयाने  पाचशे रुपयांचा दंड बजावून त्यांच्यावरील अटक वॉरंट रद्द केल्याची माहिती ॲड. अर्चित साखळकर यांनी दिली.

२००८ मध्ये राज ठाकरेंना एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ परळीत मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती. याप्रकरणी चिथावणीखोर वक्तव्याबद्दल राज ठाकरेंवर परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर न्यायालयात तारखेला गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

Web Title: MNS president Raj Thackeray was fined Rs 500 by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.