उल्हासनगरात मनसेकडून रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 21:09 IST2025-08-06T21:08:43+5:302025-08-06T21:09:29+5:30
उल्हासनगर रस्त्यातील खड्ड्या विरोधात मनसेने बुधवारी दुपारी १ वाजता जवाहर हॉटेल समोरील रस्त्यावर आंदोलन करून खड्ड्यात वृक्षारोपण केले.

उल्हासनगरात मनसेकडून रस्त्याच्या खड्ड्यात वृक्षारोपण
उल्हासनगर रस्त्यातील खड्ड्या विरोधात मनसेने बुधवारी दुपारी १ वाजता जवाहर हॉटेल समोरील रस्त्यावर आंदोलन करून खड्ड्यात वृक्षारोपण केले. महापालिकेने यानंतरही रस्त्यातील खड्ड्यावर तोडगा न काढल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बंडू देशमूख यांनी महापालिका आयुक्ताना दिला.
उल्हासनगरात विकास कामाच्या नावाखाली एका वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेले सिमेंट रस्ते खोदण्यात येत आहे. मात्र खोदलेले रस्ते पुन्हा जेसे थे बांधले गेले नसल्याने रस्ते खड्डेमय झाले. दरम्यान आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी प्रत्येक प्रभाग समितीला तात्पुरते खड्डे भरण्यासाठी १० लाख रुपये दिले होते. मात्र या निधीतून कोणते खड्डे भरले. असा प्रश्न निर्माण झाला.. मनसेचे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख, जिल्हा संघटक दिलीप थोरात, शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी खड्डे भरण्याबाबत. महापालिकेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी १ वाजता जवाहर हॉटेल समोर आंदोलन करून खड्ड्याला रांगोळी काढून खड्ड्यात वृक्षारोपण केले.
आंदोलनाला मनसेचे सचिन बेंडके, शैलेश पांडव, मुकेश सेठपलांनी, कैलास घोरपडे, प्रमोद पालकर, हितेश मेहरा, अक्षय धोत्रे, रोहित देवकर, नटवर वासिटा, अनिल गोधडे, सुहास बनसोडे, विक्की जिप्सन, प्रमोद गायकवाड, मंजू बेंडके, विशाखा गोधडे, नंदा धोत्रे, चांदबीबी जाफर शेख, पूनम साळवे, भारती मोरे ,लताबाई जाधव, रितू गमरे, सोनाली गीते, योगिता गमरे, सविता रावल, रमेश जाधव, संतोष पायाळ, अमोल पाटील, विनायक पवार, प्रशांत संगाळे, हिरो राजई, सुधीर सावंत आदिजण उपस्थित होते.