… उद्धव ठाकरेंना आज ‘एकनाथ’ महाराज नक्कीच आठवले असतील, शालिनी ठाकरेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 16:16 IST2022-06-21T16:14:17+5:302022-06-21T16:16:07+5:30

दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या : शालिनी ठाकरे

mns leader shalini thackeray slams shiv sena leader cm uddhav thackeray maharashtra politics mahavikas aghadi eknath shinde surat | … उद्धव ठाकरेंना आज ‘एकनाथ’ महाराज नक्कीच आठवले असतील, शालिनी ठाकरेंचा टोला

… उद्धव ठाकरेंना आज ‘एकनाथ’ महाराज नक्कीच आठवले असतील, शालिनी ठाकरेंचा टोला

राज्यात विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य सुरू झालं आहे. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे काही आमदार सूरतमध्ये पोहोचलेत. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींनंतर मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे.

“"एकनाथ" महाराज की जय....!!! मला सर्वसामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला पाहायचा आहे, या स्वतःच्या वाक्याचा विसर पडलेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज ‘एकनाथ’ महाराज नक्कीच आठवले असतील. दीपाली ताई आपण आता स्वत:च्या पक्षाच्या तब्येतीची काळजी घ्या,” असा खोचक टोला शालिनी ठाकरे यांनी लगावला आहे.


‘… आणि मुख्यमंत्री तोंडावर आपटले’
““सबको समझा. आपको समझा क्या..?? पुन्हा एकदा महाभकास आघाडीचे गणित चुकले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री तोंडावर आपटले. आता कोण एकटे पडले हे समजले असेलच. तुमच्यात एकजूट किती आहे हे सगळ्यांना समजले. पण तुम्हाला कधी समजणार?,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

 

Web Title: mns leader shalini thackeray slams shiv sena leader cm uddhav thackeray maharashtra politics mahavikas aghadi eknath shinde surat