शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Amol Mitkari"वेशांतर करून महाराष्ट्रात तोंड लपवून फिरायची..."; मनसेचा अमोल मिटकरींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 11:26 IST

Amol Mitkari Latest News राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली होती. त्यावरून अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं. त्यानंतर आता मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यातील वाद उफाळून आला आहे.

मुंबई - आम्हाला जे सुपारीबाज म्हणतात, त्यांच्यासारखं आम्हाला तोंड लपवून दिल्लीला जायची वेळ आली नाही. जी भूमिका घेतली ती उघड घेतली. राज ठाकरे, अमित ठाकरे दिल्लीला समोरासमोर गेले. तुमच्यासारखे मास्क लावून, वेशांतर करून जायची गरज पडली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात तोंड लपवून कुणाला फिरायची गरज आहे हे एकदा अमोल मिटकरींनाही समजलं पाहिजे असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.

अकोला इथं मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. यानंतर मनसे-राष्ट्रवादीत चांगलीच जुंपली आहे. याबाबत पत्रकार परिषद घेत संदीप देशपांडे म्हणाले की, नॅरेटिव्ह कुणीही सेट करतं, आम्ही जी भूमिका घेतली ती लोकांसमोर घेतली. सुपारीबाज कोण तर ज्यांनी २०१९ ला भाजपासोबत गळ्यात गळे घालून निवडणूक लढवली आणि निकालानंतर पवारांच्या मांडीवर बसले हे सुपारीबाज नाहीत का? जे शरद पवार शिवसेनेविरोधात लढले, ज्यांनी शिवसैनिकांना कुत्र्यांची उपमा दिली त्यानंतरही उद्धव ठाकरे शरद पवार गळ्यात गळे घालून फिरतायेत ते सुपारीबाज नाहीत का?. दुसऱ्यांना सुपारीबाज म्हणण्यापूर्वी तुम्ही किती वेळा भूमिका बदलली? असा सवाल करत मनसेनं आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला.

तसेच इथल्या मारवाडी कंत्राटदारांची सुपारी आदित्य ठाकरेंनी घेतली आहे. याच कंत्राटदारांसोबत तुम्ही महापालिकेत ५ वर्ष घालवली. ज्या इक्बाल चहल यांना तुम्ही आज नावं ठेवताय त्यांनाच हाताशी धरून तुम्ही कोविड काळात भ्रष्टाचार केलात ना, आम्ही जनतेची सुपारी घेऊ, विकासाची सुपारी घेऊ आणि तुम्हाला घरी बसवण्याची सुपारी घेऊ, आदित्य ठाकरे वरळी सोडून सर्व मुद्द्यांवर बोलतात, साडेचार वर्ष ते वरळीत फिरकलेच नाहीत असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला.

दरम्यान, स्वत:ची लायकी नसताना अमोल मिटकरींनी राज ठाकरेंवर टीका केली. ती क्रिया होती त्यावर तिथल्या महाराष्ट्र सैनिकांशी प्रतिक्रिया दिली. आमचे लोक झाडू घेऊन मारायला गेले होते. तो मुर्ख माणूस आहे त्यांच्यावर फारसं लक्ष द्यायला नको. जो काही हल्ला झाला तो सांगून नाही तर उत्स्फुर्त झाला असं सांगत संदीप देशपांडेंनी मिटकरींवर घणाघात केला. 

टॅग्स :MNSमनसेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेAmol Mitkariअमोल मिटकरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारRaj Thackerayराज ठाकरे